Latest

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्‍थानाची सुरक्षा वाढवली

निलेश पोतदार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस सज्ज ठेवण्यात आले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण देखील सुरू आहे. मराठा समाजाने यापूर्वी लाखोंच्या संख्येने शांत पद्धतीने अनेक मोर्चे काढले, परंतु आता मराठा आरक्षणासाठी हिंसक वळण लागले आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या ठाण्यातील कार्यालयात सुनील तटकरे आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवत मराठा बांधवांनी निषेध केला. तसेच अंबादास दानवे देखील ठाण्यात येणार असल्याचे कळताच मराठा बांधवांनी घोषणाबाजी केल्या.

तर राज्यांत देखील काही आमदारांच्या घरात आणि कार्यालयावर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा फौज फाटा वाढवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस सज्ज ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT