Latest

कपिलचा कॉमेडी द कपिल शर्मा शो होणार बंद, मोठे कारण आले समोर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

कॉमेडियन कपिल शर्मा नुकताच 'द काश्मीर फाईल्स'च्या प्रमोशनच्या मुद्द्यावरून वादात सापडला होता. आता 'द कपिल शर्मा शो' बंद होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. 'द कपिल शर्मा शो' बंद होऊ शकतो, अशी चर्चा होत आहे. यामागे मोठे कारण सांगितले जात आहे.

कपिल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्याने एक पोस्ट केलीय. त्यानंतर हा शो बंद होणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. कपिलने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने सांगितले की, या वर्षी तो अमेरिका आणि कॅनडा ट्रिपवर खूप एन्जॉय करणार आहे. (Really happy to announce my US-Canada Tour 2022, See you all soon ?❤️?????)

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, कपिल शोमधून ब्रेक घेणार असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. यामुळे त्याचा लोकप्रिय शो ऑफ एअर होऊ शकतो.

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, कपिल जवळपास एक महिन्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. त्याच्या सहलीमुळे शूटिंग शक्य होणार नाही. यामुळे हा शो तात्पुरता बंद होऊ शकतो. कपिल शर्मा एका महिन्यात भारतात परतताच तो पुन्हा शूटिंगला सुरुवात करेल. याला काही आठवड्यांचा ब्रेक असेल, असे म्हटले जात आहे.

पूर्वी जानेवारी २०२१ मध्ये कपिलने शोमधून ब्रेक घेतला होता. दुसऱ्यांदा बाळ झाल्यानंतर त्याने काही दिवसांसाठी हा शो बंद केला. फॅन्सच्या प्रश्नाला उत्तर देताना खुद्द कपिल शर्माने सांगितले की, त्याची घरी गरज आहे. माझी पत्नी दुसऱ्यांदा आई झाली आहे, त्यामुळे मी कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी काही दिवस शोमधून ब्रेक घेत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT