Latest

Arvind Kejriwal vs ED : ईडीकडून अरविंद केजरीवाल यांना ८ वे समन्स; ४ मार्चरोजी हजर राहण्याचे आदेश

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना 8 वे समन्स बजावले आहे. त्यांना 4 मार्चरोजी हजर राहण्यास सांगितले आहे. Arvind Kejriwal vs ED

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणाचा तपास सुरू आहे. याची चौकशी करण्यासाठी केजरीवाल यांनी याआधी 7 वेळा समन्स बजावण्यात आले आहे. मात्र, ते अद्याप अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात गेलेले नाहीत. 26 फेब्रुवारीलाही केजरीवाल अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले नाहीत. आम आदमी पक्षाने ईडीच्या सातव्या समन्सवर म्हटले होते की मुख्यमंत्री केजरीवाल ईडी कार्यालयात जाणार नाहीत. कारण हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. ज्याची सुनावणी 16 मार्चरोजी होणार आहे.

22 फेब्रुवारीरोजी अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांना सातवे समन्स बजावले होते आणि त्यांना 26 फेब्रुवारीरोजी हजर राहण्यास सांगितले होते. मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत सात समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र दिल्ली दारू घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात ते अद्यापपर्यंत अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झालेले नाहीत. यापूर्वी 14 फेब्रुवारीला सहावे समन्स जारी करून त्यांना 19 फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले होते.

मात्र त्या समन्सानंतर केजरीवाल हजर झालेले नाहीत. हे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे ईडीने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT