Latest

Nashik News : आपकडून केंद्र सरकारची प्रतीकात्मक शवयात्रा, ईडीच्या कारवाईचा निषेध

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, दिल्लीचे खासदार संजय सिंह यांच्यावर ईडीकडून सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने गुरुवारी (दि.५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. यावेळी पक्षातर्फे केंद्र सरकारची प्रतीकात्मक शवयात्रा काढत निषेध करण्यात आला. (Nashik News)

संबधित बातम्या :

दिल्लीमध्ये मद्य धोरणातील कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून बुधवारी (दि.४) आपचे खासदार सिंह यांची दहा तास चौकशी करत अटक करण्यात आली. अटकेविरोधात आपतर्फे शहरात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारची प्रतीकात्मक शवयात्रा काढताना केंद्र व ईडीविरोधात घोषणा देण्यात आल्या. (Nashik News)

केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार काम करणाऱ्या ईडीवर सामान्यांचा विश्वास उरलेला नाही. आप पक्ष वेगाने वाढत असल्यामुळे केंद्र सरकार पक्षाच्या मुख्य नेत्यांना जेलमध्ये टाकत आहे. कोणतेही भक्कम पुरावे नसताना केवळ पक्ष कमजोर करण्यासाठी केंद्राकडून कारवाई केली जात असून, यातून सरकारची प्रवृत्ती दिसते, असा आरोप आपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. आंदोलनामध्ये पक्षाचे राज्य संघटनमंत्री नविंदर अहलुवालिया, योगेश कापसे, प्रदीप लोखंडे, नूतन कोरडे, ॲड. प्रभाकर वायचळे, कलविंदर गरेवाल, अल्ताफ शेख, अमित यादव यांच्यासह कायकर्ते सहभागी झाले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT