Nashik News : विचित्र वातावरणाने नाशिककर फणफणले; सर्दी-खोकला-तापाचे रुग्ण वाढले

Nashik News : विचित्र वातावरणाने नाशिककर फणफणले; सर्दी-खोकला-तापाचे रुग्ण वाढले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, दिवसा उन्हाचा चटका अन् रात्री थंडीचा कडाका या बदलेल्या वातावरणामुळे सर्दी-ताप-खोकल्याच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बदललेल्या वातावरणाचा लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे दवाखान्यांमध्ये अचानकच रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर देखील ताण निर्माण झाला आहे. (Nashik News)

संबधित बातम्या :

सध्या पावसाळा हा ऋतु सुरू असला तरी, उन्हाचेच चटके अधिक बसत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून बदलेल्या वातावरणाचा आरोग्यावर प्रचंड विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात दिवसा उन, सायंकाळी पाऊस अन् रात्री थंडी असे वातावरण असल्याने सर्दी-ताप-खोकल्याच्या रुग्णांमध्यये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. याव्यतिरिक्त घशात खवखवणे, अंगदुखी, धाप लागणे हे लक्षणे देखील दिसून येत असल्याने, सध्या रुग्णालये रुग्णांनी भरून गेले आहेत. 'व्हायरल इन्फेक्शन' ही एकमेव तक्रार वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर देखील ताण निर्माण होताना दिसत आहे. दरम्यान, व्हायरल इन्फेक्शनच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता, वारंवार हात स्वच्छ धुणे, आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे, पौष्टिक आहार घेणे, हस्तांदोलन टाळणे, पाणी भरपूर पिणे, पुरेशी झोप घेणे या गोष्टी केल्या तर या आजारांना बऱ्यापैकी आळा बसेल, असे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. (Nashik News)

डेंग्यूची साथ सुरू असतानाच 'व्हायरल इन्फेक्शन'च्या तक्रारी वाढल्याने नागरिकांनी विशेष सर्तकता बाळगण्याची गरज आहे. वारंवार ताप येत असेल तर अंगावर काढू नये. तत्काळ औषधोपचार घ्यावा.

– डॉ. विशाल निकम

—–

'व्हायरल इन्फेक्शन'च्या तक्रारी वाढत असल्याने, लहानग्यांबाबत विशेष सतर्कता बाळगा. घरात कोणी आजारी असेल तर लहान मुलांना त्यांच्यापासून लांब ठेवा. तसेच लक्षणे आढळून आल्यास, वेळीच औषधोपचार करा.

– डॉ. अमोल मुरकुटे

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news