Latest

Maharashtra NCP Crisis: जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून निषेध

अविनाश सुतार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : अजित पवार यांच्या बंडानंतर ठाण्यातील राष्ट्रवादीमधील संघर्ष उफाळून आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला. विशेष म्हणजे आंदोलन करणारे सर्व कार्यकर्ते हे नजीब मुल्ला यांचे समर्थक आहेत. त्यामुळे आता भविष्यात अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष  (Maharashtra NCP Crisis) अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.

अजित पवार  यांच्या बंडानंतर ठाण्यातील अजित पवार समर्थक आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांना समर्थन देणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीमधील दुसरा गट सक्रिय (Maharashtra NCP Crisis) झाला आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणे परिवहनचे सदस्य मोसीन मुल्ला हे नजीब मुल्ला यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी आणि काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारून या दोन्ही नेत्यांचा निषेध केला आहे. यावेळी या दोन्ही नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अजित पवार यांना ठाणे शहर आणि जिल्ह्यातून समर्थन देणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. ठाण्यातील माजी नगरसेवक आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला हे सुरुवातीपासून अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. पवार यांच्या बंडानंतर अपेक्षेप्रमाणेच मुल्ला यांनी आपले समर्थन अजित पवार यांना दिले आहे. महापालिकेत आणि पक्षात मुल्ला यांचे राजकीय वजन असल्याने त्यांच्या मागे समर्थकांची संख्याही जास्त आहे. एकाच पक्षात असताना जितेंद्र आव्हाड आणि मुल्ला यांचे संबंध फारसे मधुर नव्हते. यावरूनही दोन्ही मुल्ला आणि आव्हाड समर्थकांमध्ये मतभेद होते. अजित पवार यांच्या बंडानंतर अखेर हे मतभेद चव्हाट्यावर आले. भविष्यात हा संघर्ष अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT