Photo Removed from NCP office : राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यालयातून प्रफुल्ल पटेल यांचे छायाचित्र हटविले | पुढारी

Photo Removed from NCP office : राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यालयातून प्रफुल्ल पटेल यांचे छायाचित्र हटविले

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार यांच्या बंडाला साथ दिलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे छायाचित्र पक्षाच्या युवा कार्यालयातून कार्यकर्त्यांनी हटविले. शरद पवार यांची साथ सोडलेल्या पटेल यांच्याबरोबर इतर नेत्यांची छायाचित्रे काढण्यात आली असल्याची माहिती युवा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दूहन यांनी सांगितले.

सिब्बल यांचा भाजपला टोला

दरम्यान विरोधी पक्षांना फोडण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपने सुरु केला असल्याची टीका राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी केली आहे. ‘पहिल्यांदा भ्रष्ट नेत्यांना लक्ष्य करायचे, त्यांच्यामागे तपास संस्था सोडायच्या आणि नंतर त्यांना स्वीकारायचे व त्यांचा पाठिंबा घ्यायचा’ ही भाजपची नीती महाराष्ट्रातील घडामोडीद्वारे पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे, असे सिब्बल यांनी सांगितले.

Back to top button