Latest

ठाणे : तिकीट विचारले म्हणून ‘टीसी’वर प्रवाशाचा ब्लेडने हल्ला

अमृता चौगुले

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशाकडे तिकीट विचारले म्हणून टीसीवर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना आंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्मवर घडली. जखमी टीसीला प्रथम उपचार करून कल्याण रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सुनील गुप्ता असे जखमी टीसीचे नाव आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास आंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्मवर टीसी गुप्ता हे तिकीट तपासत होते.यावेळी एका प्रवाशाला त्यांनी तिकीट दाखवायला सांगितले. त्यावेळी प्रवाशांने खिशातले ब्लेड काढत त्यांच्या मानेवर वार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या गुप्ता यांना तात्काळ रेल्वेच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोराविरोधात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या सहायाने हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

हेही वाचा  : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT