पाच वर्षात ४ लाख कोटींहून अधिक रुपयांची कर्ज वसुली : लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्र्यांची माहिती | पुढारी

पाच वर्षात ४ लाख कोटींहून अधिक रुपयांची कर्ज वसुली : लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्र्यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली- अनुसूचित वणिज्य बॅंकांनी गत पाच आर्थिक वर्षात १० लाख ९ हजार ५११ कोटी रुपये निर्लेखित (राईट ऑफ) केले आहेत. तर, कर्जदारांकडून थकीत रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थंमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी लोकसभेत दिली.निर्लेखित करण्यात आलेल्या कर्जांसह नॉन-परफॉर्मिंग अँसेट (एनपीए) खात्याची वसुली एक सतत प्रक्रिया आहे, असे अर्थमंत्री म्हणाल्या.

भारतीय रिझर्व्ह बॅकेच्या (आरबीआय) आकडेवारीनूसार सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी गत पाच आर्थिक वर्षांदरम्यान ४ लाख ८० हजार १११ कोटींच्या कर्जांची वसुली केली आहे.यात निर्लेखित करण्यात आलेल्या कर्जांचे १ लाख ३ हजार ४५ कोटी रुपयांचा देखील समावेश असल्याचे सीतारामण म्हणाल्या. बुडीत कर्जांच्या वसुलीसाठी कर्जदार उत्तरदायी राहतील तसेच या कर्जदारांकडून थकित रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बॅंकांनी उपलब्ध विविध वसुली तंत्रांच्या माध्यमातून बुडीत खात्यात टाकण्यात आलेल्या रक्कमेची वसुली सुरू ठेवली आहे. दीवानी न्यायालयात अथवा कर्ज वसुली न्यायाधिकरणात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सीतारामण म्हणाल्या.

हेही वाचा : 

 

Back to top button