Latest

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा : रामदास आठवले

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेतील अंतर्गत वादाशी आमचा काहीही संबंध नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे स्वतः आपापसातील वाद मिटवतील. पण शिवसेनेची जी दादागिरी सुरू आहे ती योग्य नाही. उद्धव ठाकरे यांनी शांततेचे आदेश द्यावेत असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

आम्ही सरकार स्थापनेचा विचार केलेला नाही. येणाऱ्या काळात काय होते ते पाहू. शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बहुमत दाखवू असे म्हणतात. पण एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार मुंबईत आल्यानंतर तुमच्याकडे येतील असे वाटत असेल तर चुकीचे आहे. अनेक आमदार तुम्हाला सोडून गेले आहेत. प्रयत्न करायचे असतील तर करा पण शिवसेनेची जी दादागिरी सुरू आहे ती थांबवा. तोडफोड करायची असेल तर एकनाथ शिंदेंच्याकडेही अनेक शिवसैनिक आहेत. त्यामुळे अशाप्रकारची दादागिरी योग्य नाही. ठाकरेंनी शांततेचे आदेश द्यायला हवेत, असे आठवले म्हणालेत.

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. दोन तृतीयांश आमदार शिंदे गटाकडे आहेत. आमदारांवर कारवाई करण्याचा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना अधिकार नाही.  तसेच शिवसेनेतील अंतर्गत वादाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT