Latest

Thackeray And Kejriwal : आदित्य ठाकरे- अरविंद केजरीवाल यांच्यात राजकीय खलबते

backup backup
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर देशातील विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (युबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी आज (दि.१४) 'आप' नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. राजकीय मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती  केजरीवाल यांनी दिली. (Thackeray And Kejriwal )
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव केला आहे. भाजपच्या या पराभवानंतर विरोधी पक्षांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आदित्य ठाकरे आणि केजरीवाल यांच्या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. आगामी निवडणुकांत भाजपला मात देण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याबरोबरच भावी राजकीय समीकरणांवर ठाकरे आणि केजरीवाल यांच्यात खलबते झाल्याचे तसेच महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवरही चर्चा झाल्याचे समजते.
भाजपविरोधी आघाडी मजबूत करण्यासाठी संयुक्त जदचे नेते नितीश कुमार यांनी पुढाकार घेतलेला आहे. अलीकडेच त्यांनी मुंबईला जाऊन उद्धव ठाकरे व शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी घेतलेली केजरीवाल यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.
हेही वाचा
SCROLL FOR NEXT