Latest

Teddy bear : मंगळावर दिसला ‘टेडी बियर’!

Arun Patil

वॉशिंग्टन : मंगळभूमीच्या अनेक छायाचित्रांमध्ये लोकांना आजपर्यंत विविध प्रकारचे भास झालेले आहेत. कुणाला तिथे चालणारी व्यक्ती दिसली तर कुणाला घर, कुणाला तिथे विविध पशू-पक्ष्यांचेही आकार दिसले. आताही मंगळावरील एका छायाचित्रात अस्वलाचा चेहरा पाहिला जात आहे. हा गोंडस 'टेडी बियर' (Teddy bear) पाहून अनेक लोक थक्क होत आहेत. ध्रुवीय अस्वलाचीही अनेकांना आठवण आली.

अ‍ॅरिझोना युनिव्हर्सिटीने 25 जानेवारीला एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये बटणासारखे दोन 'डोळे' (Teddy bear) दिसतात. नाक व चेहर्‍याचा थोडा भाग लांबट आणि वर सरकलेला आहे. एकंदरीत हा आकार एखाद्या अस्वलाच्या चेहर्‍यासारखाच दिसत आहे. 'नासा'च्या रिकनायसन्स ऑर्बिटरच्या कॅमेर्‍याने 12 डिसेंबर 2022 मध्ये हे छायाचित्र टिपले होते.

हे ऑर्बिटर मंगळभूमीपासून 251 किलोमीटर उंचीवर असताना हे छायाचित्र टिपले गेले होते. (Teddy bear) ही अस्वलाच्या चेहर्‍यासारखी जी आकृती दिसत आहे ती वास्तवात एखाद्या प्राचीन क्रेटर म्हणजेच विवरातील तुटलेल्या डोंगराची असू शकते. एक मोठी, गोलाकार दरी 'अस्वला'ची चेहरेपट्टी बनवत आहे. मध्यभागी असलेली इंग्रजी 'व्ही'सारखी आकृती नाकाचा भाग दर्शवते. बटणासारखे डाग डोळ्यांसारखे दिसतात.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT