A career in the automotive industry : वाहन उद्योगात करिअर करायचंय? | पुढारी

A career in the automotive industry : वाहन उद्योगात करिअर करायचंय?

डिझाईन, इंजिनिअरिंग, उत्पादन, ऑपरेशन्स, मनुष्यबळाचे व्यवस्थापन, विक्री आणि सेवा, वितरण, अर्थ, कस्टमर केअर, आयटी, संशोधन (A career in the automotive industry) आणि विकास यासारख्या विविध क्षेत्रात रोजगाराच्या संंधी उपलब्ध होताना दिसून येत आहेत.

इलेक्ट्रिक वाहने, हायब्रीड कार, ई-बाईक, ई-ऑटो (A career in the automotive industry) यासारख्या पर्यायी इंधनाच्या क्षेत्राने वाहनविश्वात परिवर्तन घडून येताना दिसत आहे. भारतात स्वदेशी आणि परकीय, दोन्ही ऑटोमोबाईल्स कंपन्या आपल्या प्रक्रियाकडे आणि तंंत्रज्ञानात बदल घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. वाहन उद्योगाचा सध्याचा एकंदर आकार 7.5 लाख कोटींहून अधिक आहे. 2025 पर्यंत तो 15 लाख कोटींपर्यंत नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. अशा स्थितीत प्रशिक्षित ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंगची मागणी वाढली आहे.

करिअर म्हणून पाहताना ऑटोमोबाईल्स (A career in the automotive industry) इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात व्यावसायिकांसाठी निश्चित रुपाने दर्जेदार संधी आहेत. ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंग हे मॅकनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्ट आणि कॉम्प्यूटर सायन्स यासारख्या इंजिनिअरिंगच्या विविध शाखांच्या तत्त्वांचे मिश्रण आहे. या उद्योगात ऑटोमोबाईल्सचे डिझाईन, निर्मिती, परीक्षण, देखभाल आदींचे काम तडीस नेले जाते.

रोजगाराची संधी

ऑटोमोबाईल्स उद्योगात (A career in the automotive industry) बाईक, स्कूटर, मोटारसायकल, ऑटो, मोटार, ट्रक, ट्रॅक्टर, लष्कराची वाहने आणि बस यांची निर्मिती केली जाते. ऑटोमोबाईल्स उद्योग आणि त्याचबरोबर त्याचे स्पेअरपार्ट तयार करणारे उद्योग, हे सक्षम ऑटोमोबाईल्स इंजिनिअरना विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध करून देताहेत.

ऑटोमोबाईल्स उद्योगात (A career in the automotive industry) रोजगाराच्या संधीचे मुख्य तीन क्षेत्र आहेत. डिझाईन, डेव्हलपमेंट (विकास) आणि मॅन्यूफॅक्चरिंग (निर्मिती). डिझाईन अंतर्गत वाहन किंवा कंम्पोनेंटचा कच्चा आरखडा तयार केला जातो. डेव्हलपमेंट इंजिनिअर हा कच्च्या आराखड्याचे मूल्यांकन करतो आणि मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगच्या सल्ल्यानुसार वाहनाची निर्मिती करतो.

ऑटोमोबाईल्स इंजिनिअरला (A career in the automotive industry) ऑटोमाबाईल्स डिझायनर, प्रॉडक्शन इंजिनिअर, ड्रायव्हर इन्स्ट्रूमेंशन इंजिनिअर, क्वालिटी इंजिनिअर, ऑटोमेटीव्ह टेक्निशियन आणि पेंट्स स्पेशालिस्ट प्रमुख या प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. रोजगाराचे अन्य साधन म्हणजे गॅरेज सुरू करणे. या क्षेत्रात संशोधन आणि अध्यापनाचे पर्याय देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंगमध्ये संशोधनाची संधी देणार्‍या घटकात एरोडायनॅमिक्स, पर्यायी इंधन चेसिस, इलेक्ट्रॉनिक निर्मिती, साहित्य, मोटर स्पोर्ट, पॉवर ट्रेन, रॅपिड प्रोटोटायपिंग, वाहन आणि पादचारी प्रवाशांची सुरक्षा किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंटचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

ऑटोेमोबाईल इंजिनिअरमध्ये (A career in the automotive industry) डिप्लोमापासून पीएच.डी.पर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक विद्यार्थी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये करिअर म्हणून बीई किंवा बीटेक अभ्यासक्रमाने सुरुवात करू शकतात. तसेच मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई किंवा बीटेक अभ्यासक्रम केल्यानंतर ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंगमध्ये एमटेक करू शकतात.

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगअंतर्गंत (A career in the automotive industry) काही विषयात थर्मोडायनॉमिक्स, एरोडायनामिक्स, इलेक्ट्रिकल मोशन, कंबस्चन इंजिन, व्हेइकल चेसिस, सप्लाय चेन मॅनजेंमट, मशिन डिझायन, कॉम्प्यूटर अ‍ॅडेड डिझाईन, प्रोटोटाइप क्रिएशन्स आणि एर्गोनॉमिक्स, फ्लुईड मॅकनिक्स, एमिशन्स, वर्कशॉप तंत्रज्ञान याचा समावेश आहे. इंटरशिपदरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष ठिकाणी कामाचा अनुभव घेतात. या कामात मोटारीला हविस (हॉईस्ट) वर वर उचलणे, एअर फिल्टर, इंधन फिल्टर, इंजिन ऑइल, स्पार्क प्लग बदलणे, टायर पंक्चर काढण्यापासून डिझायनिंग सॉफ्टवेअरबरोबर काम करणे आणि कंपोनेन्टस असेंब्ल करणे आदी प्रशिक्षणाचा त्यात समावेश असतो. इंजिनिअर मॅकनिक्स, अप्लाईड थर्मोडायनॅमिक्स, मॅकनिकल इंजिनिअर, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन आदी विषयात प्रमाणपत्र आणि डिप्लोमा अभ्यासक्रम विविध अभियांंत्रिकी महाविद्यालयात, पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत.

महेश शिपेकर  

Back to top button