Latest

Tata Consultancy Services : ‘वर्क फ्रॉम होम’साठी मेडिकल सर्टिफिकेट दाखवा; ‘या’ आयटी कंपनीचे कर्मचाऱ्यांना फर्मान

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक कंपन्यांनी कोरोनाच्या काळात आणि त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' (WFH) अर्थात घरातून काम करण्याची मूभा दिली होती. अद्याप अनेक कंपन्यांचे कर्मचारी हे वर्क फ्रॉम होमच काम करत आहेत. यानंतर आता पुन्हा अनेक कंपन्यांनी कार्यालयातून काम सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. पण, या वर्क फ्रॉम होम पद्धतीची सवय लागल्याने अनेक कर्मचारी अद्याप कंपनी कार्यालयातून काम करण्यास उत्सुक नाहीत. ते घरातूनच काम करत आहेत. कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात बोलवण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या शक्कल सुद्धा लढवत आहेत. भारतातील दिग्गज आयटी कंपनी 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' (टीसीएस) (Tata Consultancy Services) आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्यासाठी बोलावणे धाडले आहे. पण, कर्मचाऱ्यांचा मिळणारा थंड प्रतिसाद पहाता टीसीएसने जर तुम्हा वर्क्र फ्रॉम होम काम करायचे असेल तर मेडिकल सर्टिफिकेट दाखवावे लागेल असे सांगितले आहे.

मेडिकल सर्टीफिकेटची टीसीएसकडून मागणी (Tata Consultancy Services)

कोरोनाच्या काळात व त्यानंतर वर्क फ्रॉम होम हे कल्चर बऱ्याच अंशी रुढ झाले होते. ते आता कर्मचाऱ्यांना सुद्धा मानवलेले आहे, असे दिसते. आता टीसीएसने कर्मचाऱ्यांना बोलावणे पाठवून देखील कर्मचारी प्रत्यक्ष कामावर येऊन काम करण्यास टाळाटाळ करत आहेत. यासाठी ते आजारी असल्याची कारणे सुद्धा कंपनी व्यवस्थापणाला देत आहेत. यांनतर कंपनीने कर्मचाऱ्यांकडून आरोग्य प्रमाणपत्राची मागणी केली आहे.

कंपनीच्या डॉक्टर्सकडून करुन घ्यावी लागेल तपासणी

आता कंपनीने मेडिकल सर्टिफिकेट मागतले म्हटल्यावर तुम्ही म्हणाल त्यात काय येवढे, आपण आपल्या ओळखीच्या डॉक्टरकडून हवं तसं सर्टिफिकेट बनवून घेऊ व कंपनीला सादर करु. पण, तसे नाही कंपनीने बोगस सर्टिफिकेटवर निर्बध घालण्यासाठी जालीम उपाय शोधला आहे. ज्या कर्मचाऱ्याला कंपनी कार्यालायत यायचे नाही व तो तब्बेतीची कारणे देत आहे, अशांना कंपनी तिच्या यादीत असणाऱ्या डॉक्टरांकडे पाठवून तपासणी करण्यास सांगत आहे. याद्वारे कंपनी प्रत्यक्ष पहाणार आहे की, खरच कर्मचारी कार्यालयात येऊन काम करण्यासाठी सक्षम आहे किंवा नाही. तसेच अशा तपासणीत संबधीत कर्मचारी तंदुरुस्त आढळला नाही तर कंपनी त्याला घरुन काम करण्याची मुभा देऊ शकते.

कर्मचाऱ्यांना पाठवले ईमेल

टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांना एक ईमेल केला आहे. ज्यामध्ये कंपनीच्या पॅनलमध्ये असणाऱ्या डॉक्टरांकडे तपासण्या आणि उपचार संदर्भातील प्रमाणपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. याचा अर्थ सरळ आहे की कंपनी काहीही करुन कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू होण्यास भाग पाडत आहे. (Tata Consultancy Services)

कंपनीचे कर्मचाऱ्यांच्या हजेरीवर लक्ष

टीसीएसच्या डॉक्टरांनी समुपदेशन केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा देण्यात येत आहे. पण, व्यावसायिक गरज लक्षात घेता त्यांना कार्यालयाशी संपर्क ठेवावा लागेल असे सांगण्यात आले आहे. शिवाय कंपनीने कर्मचाऱ्यांच्या हजेरीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. शिवाय जे कर्मचारी आठवड्यातून तीन दिवस कार्यालायत येत नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना स्वत:चे रोस्टर बनविण्यास सांगितले आहे. (Tata Consultancy Services)

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT