ओ सायब, आमच्या पोरांनी शिकायचं नाय का? राज्य सरकारच्या निर्णयामुळे दुर्गम भागातील पालकांचा सवाल

ओ सायब, आमच्या पोरांनी शिकायचं नाय का? राज्य सरकारच्या निर्णयामुळे दुर्गम भागातील पालकांचा सवाल
Published on
Updated on

वडगाव मावळ : वीस पटसंख्येच्या आतील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या निर्णयाची अंमलबजावणी झाली. मावळ तालुक्यातील एकूण 272 जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल 76 शाळा ह्या बंद होणार आहेत. दरम्यान, यापैकी बहुतांश शाळा ह्या दुर्गम भागात असल्याने सद्यस्थितीत या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे शिक्षणच बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे 'ओ सायब, आमच्या पोरांनी शिकायचं नाय का?' असा जाब विचारण्याची वेळ दुर्गम भागातील पालकांवर आली आहे. राज्य शासनाने वीस पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होत असला तरी अद्याप शासनाने हा निर्णय मागे घेतलेला नाही. त्यामुळे या निर्णयाचा सर्वात मोठा फटका ग्रामीण, दुर्गम, डोंगरी भागाला होणार आहे.

मावळ तालुक्यात एकूण 272 जिल्हा परिषद शाळा असून, यापैकी तब्बल 76 शाळा ह्या वीस पट संख्येच्या आतील आहेत. या 76 शाळांपैकी बहुतांश शाळा ह्या दुर्गम व डोंगरी भागातील आहेत व त्याठिकाणी वास्तव्यास असलेली मुले त्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली तर, मावळ तालुक्यातील या 76 शाळा बंद होणार आहेत. त्यामुळे संबंधित भागातील ग्रामस्थ, विविध संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

शाळा वाचविण्यासाठी विद्यार्थी, पालकांसह शिक्षक संघटनाही सरसावल्या !
मावळ तालूका प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांची भेट घेऊन तालुक्यातील वीस पटसंख्येच्या आतील शाळा बंद करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. तर मावळ तालुका शिक्षक भारती संघटनेच्या वतीनेही शाळा वाचवा हे अभियान सुरू करून प्रत्येक शाळेत जाऊन ठराव करून घेतला जात आहे. कोथुर्णे येथे विद्यार्थी व पालकांनी मोर्चा काढून या निर्णयाचा निषेध केला.

मावळातील या शाळा होतील बंद
चांदेकरवाडी, घोटकुलेवाडी खु, घोटकुलेवाडी बु, सदापूर, लोहगड, मालेवाडी, पिचडवाडी, पारिठेवाडी, अनसुटे, कुणे, मोधळेवस्ती, कशाळ फाटा, कल्हाट गावठाण, करवंदेवस्ती, धनवेवस्ती, विठ्ठलवाडी व दळवीवस्ती (चावसर), सुर्वेवस्ती, धनगरवस्ती व कातकरवस्ती (मोरवे), उकसानपठार, वडवली, शिरदे, जांभवली, कोळवाडी, सोमवडी, शिंदगाव, आंबेगाव, धामणदरा, दुधीवरे, धालेवाडी, निकमवाडी, येवलेवाडी, बेडसे, औंढोली, आनंदनगर(कुरवंडे), आपटी, वनाटी(उधेवाडी), गेव्हंडे, आतवण, धनगरवस्ती(वरसोली), साबळेवाडी, ठाकरवाडी व उकसान पुनर्वसन (नाणे), करंजगाव पठार, माऊलीनगर (कामशेत), कुरणवस्ती(निगडे), शेटेवाडी व परीटवाडी (नवलाख उंबरे), कळकराई, सावळा, तळपेवाडी, पिंपरी, सुपेवाडी(इंगळून), वाघेश्वर, बोडशीळ व शिंदेवाडी (शिळीम), अजीवली, जोवन नं 3, जोवन वसाहत, खांडशी, उंबरवाडी, कातकरवस्ती (खांडशी), वडीवळे, वेल्हवळी, शेटेवाडी(आंबळे), खरमारेवाडी, वाघमारेवाडी (टाकवे बु), पारवडी, सटवाईवाडी, लष्करवाडी, तिकोना, गेव्हंडे खडक, चिंचवाडी (कोथुर्णे), दहिवली, फांगणे वसाहत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news