पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत कोलकाता उच्च न्यायालयाने भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात अधिकारी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सदर प्रकरणावर ४ ऑगस्ट रोजी सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
सुवेंदू अधिकारी हे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर त्यांनी आपली याचिका दाखल केली आहे. अधिकारी यांनी प्रक्षोभक भाषणे केली आहेत का, याचा अभ्यास करुन त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा, असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आय. पी. मुखर्जी आणि न्यायमूर्ती बी. चौधरी यांच्या खंडपीठाने अलिकडेच दिले होते.
हेही वाचा