Latest

Rhea Chakraborty : रियाला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा, एनसीबी जामीनाला देणार नाही आव्हान

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sushant Singh Rajput प्रकरणी रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीने म्हटलं आहे की, ड्रग्ज केसमध्ये ते जामीनाला आव्हान देणार नाहीत.

रिया चक्रवर्तीला कोर्टाकडून दिलासा

रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सब्सटेंस ॲक्ट अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाकडून जामीन मिळाला आहे. आता एनसीबी आव्हान देणार नाही.

अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (एएसजी) एस व्ही राजू यांनी न्यायाधीश ए एस बोपन्ना आणि न्यायाधीश एम एम सुंदरेश यांच्या खंडपीठाला सांगितले की, एनसीबी आता रियाच्या जामीनाला आव्हान देणार नाही.

खरंतरं, बॉम्बे हायकोर्टाने रिया चक्रवर्तीला जामीनावर सुटकेचे आदेश देत म्हटले होते की, NDPS कलम २७A अंतर्गत कुणाला अवैध तस्करी करणाऱ्या गुन्हेगाराला आश्रय देण्याच्या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त २० वर्षांपर्यंत तुरुंगात पाठवलं जाऊ शकतं.

रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये मुंबई हायकोर्टाने जामीन देत म्हटले होते की, ड्रग्ज खरेदी करण्यासाठी पैसे पुरवणे म्हणजे रिया चक्रवर्ती कोणत्याही अवैध तस्करीमध्ये सामील होती असा होत नाही. यासोबतच उच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की, ड्रग्जचे सेवन करण्यासाठी एखाद्याला पैसे दिल्याचा अर्थ असा होत नाही की तिने ड्रग्ज घेण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.

SCROLL FOR NEXT