Latest

Supercar : हैदराबादच्या धनकुबेराने घेतली 12 कोटींची सुपरकार

Arun Patil

हैदराबाद : महागड्या गाड्या (Supercar) केवळ लंडन किंवा दुबईच्याच रस्त्यांवर पाहायला मिळतात असे काही नाही. आपल्याही देशात अनेकांना महागड्या गाड्यांचा शौक आहे. त्यामध्येच हैदराबादच्या नसीर खान यांचा समावेश होतो. त्यांच्याकडे रोल्स रॉयस कुलिनन ब्लॅक, लॅम्बोर्गिनी हुराकन, लॅम्बोर्गिनी उरस अशा अनेक महागड्या व आलिशान गाड्यांचा ताफा आहे. आता त्यांनी 'मॅकलॅरेन 765 एलटी स्पायडर' ही आलिशान सुपरकार खरेदी केली आहे. तिची भारतातील किंमत आहे सुमारे 12 कोटी रुपये!

या कारमध्ये 4.0 लिटर टर्बोचार्ज्ड व्ही 8 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ते 765 पीएसची ऊर्जा आणि 800 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. 7 स्पीड सिक्वेंशियल गियरबॉक्सची सुविधा असलेल्या या सुपरकारमध्ये (Supercar) पॉवर व स्पीडबाबत जबरदस्त वैशिष्ट्ये आहेत. नासीर यांच्याकडे लॅम्बोर्गिनी एवेंटडोर, फोर्ड मस्टॅग, फेरारी, जीएमसी सिएरा, मर्सिडिझ बेंझ एएमजी जी 63 आणि मर्सिडिझ बेंज जी क्लाससारख्या अनेक महागड्या मोटारी आहेत. त्यांना अलीकडेच ताज फलकनुमा पॅलेसमध्ये या सुपरकारची डिलिव्हरी मिळाली. या 'मॅकलॅरेन 765 एलटी स्पायडर कार'बरोबरचे त्यांचे फोटोही आता सर्वत्र झळकत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT