Christmas 2022 : ख्रिसमसनिमित्त मध्य रेल्वे चालवणार विशेष गाड्या

Christmas 2022 : ख्रिसमसनिमित्त मध्य रेल्वे चालवणार विशेष गाड्या
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; ख्रिसमसमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस – करमाळी, पनवेल / पुणे – करमाळी दरम्यान विशेष शुल्कासह ३६ साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. (Christmas 2022 )

Christmas 2022 : विशेष गाड्या

यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस- करमाळी द्वि-साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १९.१२.२०२२ ते ११.१.२०२३ या कालावधीत दर सोमवार आणि बुधवारी २२.१५ वाजता सुटेल आणि करमाळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे द्वि-साप्ताहिक विशेष गाडी येत्या २० डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत दर मंगळवार आणि गुरुवारी ०९.२० वाजता करमाळी येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी २१.३० वाजता पोहोचेल. सदरच्या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आदी स्थानकांतून प्रवास करणार आहेत. त्याचप्रमाणे पनवेल- करमाळी गाडी क्रमांक ०१४४७ साप्ताहिक विशेष पनवेल दि. १७ डिसेंबर ते १४ जानेवारी या कालावधीत दर शनिवारी २२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता करमाळी येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४४८ साप्ताहिक विशेष गाडी दि. १७ डिसेंबर ते १४ जानेवारी या कालावधीत दर शनिवारी ०९.२० वाजता करमाळी येथून सुटेल आणि त्याच दिवशी २०.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. सदरच्या गाड्या रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड स्थानकातून प्रवास करतील.पुणे- करमळी साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०१४४५ पुणे येथून दि. १६ डिसेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत दर शुक्रवारी १७.३० वाजता सुटेल आणि करमाळी येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४४६ साप्ताहिक विशेष गाडी १८ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत करमाळी येथून दर रविवारी ०९.२० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी २३.३५ वाजता पोहोचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या स्थानकांतून प्रवास करेल असे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news