Latest

Masala Taak : उन्हाळ्यात २ मिनिटात बनवा बाजारात मिळणारे माठातील ताक

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : कडक उन्हाळ्याच्या झळा लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना सोसाव्या लागत आहेत. एकीकडे कामाच्या गडबडीत घामाच्या धारा लागत आहेत. तर दुसरीकडे थंडगार शीतपेयांचा वापर वाढला आहे.  प्रत्येकाला काहीतरी थंडगार पेय प्यायला हवं असतं. जर कडक उन्हातून घरी आल्यावर थंडगार प्यायला मिळालं तर? मग काय घरच्याघरी माठातील थंडगार ताक बनवा. बाजारात मिळते तसे माठातील ताक बनवण्याची सोपी पद्धत आम्ही येथे सांगणार आहोत. जाणून घ्या कसे बनवायचे माठातील थंडगार मसाले ताक… ( Masala Taak )

साहित्य-

दही- १ वाटी

माठातील पाणी- २ ग्लास

काळे अणि साधे मीठ- १ छोटा चमचा

साखर- १ चमचा

धने- १ चमचा

आले- ५-६ छोटे तुकडे

पुदिना- १०-१५ पाने

लसूण- ४-५ पाकळ्या

जिरे- अर्धा चमचा

हिरवी मिरची- अर्धा तुकडा

कोथिंबीर- अर्धा कप

चुना- गव्हाच्या दाण्याच्या दुप्पट

कृती-

१. पहिल्यांदा आदल्या रात्री लावलेल्या एक वाटी फ्रेश दही घेऊन त्यात माठातील २ ग्लास पाणी घालावे.

२. एका मिक्सरच्या भांड्यात पुदिनाची पाने, जिरे, हिरवी मिरची, हवे असल्यास साखर, धने, आले, लसूण, कोंथबीर आणि चवीनुसार काळे अणि साधे मीठ घालावे.

३. यानंतर मिश्रणात अर्धा कप पाणी आणि गव्हाच्या दाण्याच्या दुप्पट चुना घालून मिक्सरमध्ये बारीक करावे.

४. वरील मिश्रणात दही आणि माठातील पाणी घातलेले मिश्रण घालावे आणि मिक्सरमध्ये मिश्रण तयार करावे.

५. यानंतर तयार झालेल्या ताकात बर्फाचे २-३ छोटे-छोटे तुकडे घालून मातीच्या माठात ओतावे.

६. तुमच्या आवडीप्रमाणे, हवे तेव्हा किंवा सकाळी, दुपारी, रात्री केव्हाही माठातील ताक करून पिऊ शकता. (Masala Taak )

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT