Latest

Stolen Tomatoes : शेतकऱ्यांनो टोमॅटो सांभाळा; शेतातील लाखो रुपयांच्या टोमॅटोवर चोरट्यांचा डल्ला…

backup backup

[tie_slideshow]

[/tie_slideshow]

पुढारी ऑनलाइन डेस्क : Stolen Tomatoes : देशभरात गेल्या काही दिवसापासून टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक ठिकाणी टोमॅटो 150 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना टोमॅटो आपल्या आहारातून वर्ज्य करावा लागत आहे. भाज्यांच्या मसाल्यातून टोमॅटो गायब होत आहे. गरीबांसाठी तर टोमॅटो खाणे हे स्वप्नवत झाले आहे. खरेतर शेतकऱ्यांसाठी ही कमावण्याची संधी आहे. मात्र, एका शेतकऱ्याच्या नशीबाने ते देखील हिरावून घेतले आहे. कारण त्याच्या शेतातून चोरट्यांनी लाखो रुपयांचे टोमॅटो चोरीला गेले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वाचा सविस्तर

टोमॅटो चोरीची ही घटना कर्नाटकच्या हासन जिल्ह्यातील आहे. हासन जिल्ह्यातील गोनी सोमनहल्ली गावातील एका महिला शेतकऱ्याच्या शेतातून हे टोमॅटो चोरीला गेले आहेत. धरानी असे या महिला शेतकऱ्याचे नाव आहे. धरानी यांनी त्यांच्या शेतातून किमान 2.5 लाख रुपयांचे टोमॅटो चोरीला गेल्याचा आरोप केला आहे. टोमॅटो चोरीची ही घटना मंगळवारी (दि4) घडली.

Stolen Tomatoes : दोन एकरात टोमॅटोचे पीक

महिला शेतकरी धरानी हीने सांगितले की, तीने दोन एकर जमिनीत टोमॅटोचे पीक घेतले होते. तिच्या नशीबाने टोमॅटोचे उत्पन्न देखील चांगले आले होते. टोमॅटोची कापणी करून हे टोमॅटो बंगळूरच्या बाजारात नेऊन विकण्याची तिची योजना होती. सध्या बंगळूरच्या बाजारात टोमॅटोला प्रतिकिलो 120 रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे यावेळी आपली चांगली कमाई होईल, म्हणून धरानी आनंदात होती. निम्म्या टोमॅटोंची कापणी देखील झाली होती. जवळपास 50 ते 60 बोरी टोमॅटो कापणीतून मिळाले होते. तर निम्मी कापणी करायची होती.

Stolen Tomatoes : आधीच्या पिकात नुकसान तर आता चोरी; कर्जामुळे महिला शेतकरी हवालदिल

महिला शेतकरीने सांगितले की टोमॅटोपूर्वी त्यांनी सेमचे पीक घेतले होते. मात्र, या पिकात त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तरी देखील कर्ज काढून त्यांनी टोमॅटोचे पीक घेतले होते. नशीबाने पीक चांगले आले होते. तसेच सध्या टोमॅटो पीकाला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे यंदा सेम पिकातील नुकसान भरून निघेल तसेच कर्ज देखील फेडता येईल अशी आशा धरानी यांना होती. मात्र चोरट्यांनी त्यांच्या आशेवर पाणी फेरले.

धरानी यांनी हलेबीडू पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की टोमॅटोच्या 50-60 बोऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या तसेच उभ्या पीकावर देखील त्यांनी डल्ला मारला आहे. एकूणच लागोपाठच्या या नुकसानीच्या घटनेने ही महिला शेतकरी हवालदिल झाली आहे.

Stolen Tomatoes : चोरीची पहिलीच घटना

पोलिसांनी टोमॅटो चोरीची ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण पोलिस ठाण्यात नोंदवले गेले आहे. दरम्यान आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे धरानी यांच्या मुलाने राज्य सरकारकडे देखील नुकसान भरपाईसह राज्य सरकारकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT