Tomato Prices : टोमॅटोच्या किंमतीत पुढील पंधरवड्यात घट होण्याचा केंद्राचा विश्वास | पुढारी

Tomato Prices : टोमॅटोच्या किंमतीत पुढील पंधरवड्यात घट होण्याचा केंद्राचा विश्वास

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Tomato Prices : देशाच्या अनेक भागात टोमॅटोचे प्रती किलोचे भाव शंभर रुपयांच्या वर गेल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील पंधरवड्यात हे दर खाली येण्याचा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. देशाची राजधानी दिल्लीचे टोमॅटोच्या किंमतीने 120 रुपयांची पातळी गाठलेली आहे.

मान्सूनच्या पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याने आवक घटली आहे, यामुळे टोमॅटोचे भाव वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशसह अन्य काही राज्यांतून टोमॅटोची आवक वाढेल आणि त्यानंतर दिल्लीसह उत्तर भारतातील टोमॅटोचे दर स्थिर होतील, असे ग्राहक संबंधित खात्याचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी सांगितले. टोमॅटोचे मोठे उत्पादन होणाऱ्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश याठिकाणी देखील भाव शंभरीच्या घरात गेले आहेत.

Back to top button