Latest

Stock Market Updates | इस्राईल- हमास युद्धामुळे बाजाराचा मूड बिघडला, सेन्सेक्स, निफ्टी घसरले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : मध्य पूर्वेतील इस्राईल आणि हमास युद्धामुळे (Israel-Hamas war) तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या वाढत्या व्याजदराच्या चिंतेने आज सोमवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स आज सुरुवातीच्या व्यवहारात ५०८ अंकांनी घसरून ६५,४८७ पर्यंत खाली आला. तर निफ्टी ५० १९,५०० च्या खाली घसरला. आज सुरुवातीला सर्व श्रेत्रात विक्री दिसून आली. दरम्यान, सकाळी १०.३० वाजता सेन्सेक्स २६० अंकांच्या घसरणीसह ६५,७३५ वर व्यवहार करत होता. (Stock Market Updates)

संबंधित बातम्या 

सेन्सेक्स आज ६५,५६० वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,५०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर टायटन, एसबीआय, एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एलटी, एचडीएफसी बँक, एम अँड एम हे शेअर्स घसरले. तर एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा आणि विप्रो हे शेअर्स वधारले आहेत.

क्षेत्रीय पातळीवर निफ्टी पीएसयू बँक २.५ टक्क्यांनी घसरला. निफ्टी मिडकॅप १०० आणि स्मॉलकॅप १०० हे सुमारे १ टक्क्यांनी घसरले.

मध्य पूर्वेतील लष्करी संघर्षामुळे (conflict between Israel and Hamas) तेलाच्या दरात प्रति बॅरल ४ डॉलर पेक्षा जास्त वाढ झाली आहे. दरम्यान, आज सोमवारी आशियामध्ये यूएस स्टॉक फ्यूचर्समध्ये घसरण झाली. आशियाई बाजारातील चीनचा शांघाय कंपोझिट (China's Shanghai Composite) ०.७ टक्क्यांनी घसरला, तर हाँगकाँगचा हँग सेंग (Hong Kong's Hang Seng) सपाट झाला. जपान आणि दक्षिण कोरियातील बाजार सुट्टीमुळे बंद होते.

परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग १३ व्या सत्रांत विकी

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) शुक्रवारी सलग १३व्या सत्रांत विक्री केली. त्यांनी निव्वळ आधारावर ९०.२९ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ७८३ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

तेल दराचा परिणाम

इस्राईल आणि हमास (Israel-Hamas war) यांच्यातील युद्ध संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर (Oil prices) वाढले आहेत. आशियाई बाजारात सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात तेलाच्या किमती प्रति बॅरल ४ डॉलर पेक्षा जास्त वाढल्या. इस्राईल आणि हमास दहशतवादी यांच्यातील लष्करी संघर्षांमुळे मध्य पूर्वेतील राजकीय अनिश्चितता अधिक वाढली आहे. याचे पडसाद आज आशियाई बाजारात दिसून आले. (Oil prices) आज ब्रेंट क्रूड सुमारे ४ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ८७.६९ डॉलरवर गेले आहे. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT