Gold Rate : सोन्याच्या दरात १३०० रुपयांनी वाढ | पुढारी

Gold Rate : सोन्याच्या दरात १३०० रुपयांनी वाढ

मुंबई : इस्रायल येथील युद्धाचा (Israel Hamas War) सोने-चांदीच्या (Gold Rate) बाजारावर परिणाम झाला आहे. एका दिवसात सोन्याचा दर तेराशे रुपयांनी वाढला असून, चांदीचा दोनशे रुपयांनी वाढला आहे.

शुक्रवारी सोन्याचा दर ५७ हजार २०० रुपये प्रति दहा ग्रॅम होता. त्यामध्ये अधिक तीन टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. शनिवारी सायंकाळी सोन्याचा दर ५८ हजार रुपये झाला. रविवारी सकाळी दोन दिवसांत तेराशे रुपयांनी दर वाढला होता. यामुळे रविवारी सोन्याचा दर जीएसटीसह ५९ हजार ७४० रुपये होता; तर चांदीचा दर ६९ हजार ५०० रुपये किलो होता. (Israel Hamas War)

Back to top button