पुढारी ऑनलाईन : जागतिक संमिश्र संकेतांदरम्यान शेअर बाजार आज मंगळवारी सपाट खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १०० अंकांनी घसरून ६५,९२२ पर्यंत खाली आला. तर निफ्टी १९,६६२ वर होता. रिलायन्स आणि एलटी सारख्या हेवीवेट स्टॉक्समध्ये तेजी आहे. पण बँकिंग आणि आयटी स्टॉक्समध्ये विक्रीचा मारा दिसून येत आहे.
संबंधित बातम्या
सेन्सेक्स (today sensex position) आज ६६,०७१ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,९०९ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, कोटक बँक, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स घसरले आहेत. तर टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, एलटी, भारती एअरटेल, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, टाटा मोटर्स हे शेअर्स वाढले आहेत. (sensex share bazar)
दरम्यान, डेल्टा कॉर्प शेअर्समध्ये (delta corp share price) सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे.
हे ही वाचा :