Latest

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी सपाट, पण Mamaearth चा शेअर बनला रॉकेट, काय कारण?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आज गुरुवारी (दि.२३) सलग दुसऱ्या दिवशी अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी आज सपाट झाले. सेन्सेक्स ५ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ६६,०१७ वर बंद झाला. तर निफ्टी ९ अंकांनी खाली येऊन १९,८०२ वर स्थिरावला.

क्षेत्रीय पातळीवर आज संमिश्र कल दिसून आला. हेल्थकेअर निर्देशांक १ टक्क्याने खाली आला. आयटी निर्देशांकही ०.५ टक्क्यांनी घसरला. तर रियल्टी, ऑईल आणि गॅस प्रत्येकी १ टक्क्याने वाढले. ऑटो निर्देशांकही काही प्रमाणात वधारला. बीएसई मिडकॅप निर्देशांक किरकोळ वाढून बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढला. बाजारात आज बँकिंग आणि मेटल क्षेत्रात खरेदी दिसून आली. तर फार्मा क्षेत्राला विक्रीचा फटका बसला.

संबंधित बातम्या 

सेन्सेक्सवर 'हे' शेअर्स घसरले

सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, एलटी, बजाज फायनान्स, टायटन, इन्फोसिस, टीसीएस हे शेअर्स घसरले. तर इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, विप्रो, रिलायन्स हे शेअर्स आज तेजीत राहिले.

निफ्टी ५० वर काय स्थिती?

निफ्टी ५० वर सिप्लाचा शेअर टॉप लूजर ठरला. हा शेअर ७ टक्क्यांहून अधिक घसरला. अल्ट्राटेक सिमेंट, LTIMindtree, एसबीआय लाईफ आणि एलटी हे शेअर्सही घसरले. तर हिरो मोटोकॉर्पचा शेअर ४ टक्क्यांनी वाढला. तसेच बजाज ऑटो, बीपीसीएल, आयशर मोटर्स, इंडसइंड बँक हेही वाढले.

Mamaearth चा शेअर २० टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये

ममाअर्थची पेरेंट कंपनी होनासा कंझ्यूमरच्या (Shares of Honasa Consumer) शेअरने आज रॉकेट भरारी घेतली. आजच्या ट्रेडिंग सत्रात बीएसईवर हा शेअर सुमारे २० टक्क्यांनी वाढून ४२२.५० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. होनासा कंपनीने नुकतेच जाहीर केलेले सप्टेंबर तिमाहीचे चांगले निकाल हे या शेअर वाढण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. Honasa Consumer Company ही Mamaearth ची पेरेंट कंपनी आहे. ही कंपनी सौंदर्य प्रसाधने बनवते. होनासा कंझ्यूमर कंपनीचा सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफा सुमारे ९३.४ टक्क्यांनी वाढून २९.४ कोटी रुपये झाला आहे. जो मागील वर्षी याच तिमाहीत सुमारे १५.२ कोटी रुपये होता. कंपनीच्या सप्टेंबर तिमाहीतील महसूल २०.९ टक्क्यांनी वाढला आहे. होनासा कंझ्यूमर कंपनीचा शेअर ७ नोव्हेंबर २०२३ रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. (Mamaearth share price)

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT