Tata Technologies IPO | टाटांची कमाल! ‘आयपीओ’वर गुंतवणूदारांच्या उड्या, मिळवले ८.९५ पट सबस्क्रिप्शन

Tata Technologies IPO | टाटांची कमाल! ‘आयपीओ’वर गुंतवणूदारांच्या उड्या, मिळवले ८.९५ पट सबस्क्रिप्शन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : टाटा ग्रुपच्या टाटा टेक्नॉलॉजीजच्या बहुप्रतीक्षित 'आयपीओ'ला (Tata Technologies IPO) गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. हा आयपीओ बुधवारी खुला होताच काही मिनिटांतच पूर्णपणे सबस्क्राइब झाला. Tata Technologies IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. ४.५ कोटी ऑफर आकाराच्या तुलनेत बोलीच्या दुसऱ्या दिवशी ४०.२८ कोटी इक्विटी शेअर्स खरेदी केले गेले. ज्यामुळे २३ नोव्हेंबरपर्यंत या आयपीओने ८.९५ पट सबस्क्रिप्शन मिळवले. (Tata Technologies IPO)

संबंधित बातम्या 

जवळपास २० वर्षानंतर टाटा समुहातील (Tata Group) कंपनीचा इनिशिअल पब्लिक ऑफर म्हणजे आयपीओ (IPO) बाजारात आला आहे. टाटा टेक्नॉलॉजीजचा (Tata Technologies) आयपीओ २२ नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला. तर तो २४ नोव्हेंबरला बंद होईल. टाटा टेक्नॉलॉजीज ही टाटा मोटर्स लिमिटेडची (Tata Motors Limited) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. जवळपास दोन दशकानंतर आलेला हा टाटा कंपनीचा हा पहिला आयपीओ आहे. त्यांचा याआधीचा आयपीओ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा होता. तो २००४ आला होता. (Tata Technologies IPO)

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांचा प्रतिसाद चांगला राहिला आहे. ज्यात उच्च उत्पन्न व्यक्तींनी वाटप केलेल्या कोट्याच्या १७.१९ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी ७.६९ पट सबस्क्रिप्शन घेतले. पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा आरक्षित भाग ४.११ पट आरक्षित करण्यात आला.

टाटा टेक्नॉलॉजीजचे कर्मचारी आणि टाटा मोटर्सचे शेअरहोल्डर्स देखील पहिल्या दिवसापासून ऑफरमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी त्यांच्यासाठी ठेवलेल्या भागांतून १.६१ पट आणि १२.८७ पट खरेदी केली होती. एकूण इश्यूपैकी २०.२८ लाख शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी आणि ६०.८५ लाख शेअर्स शेअरधारकांसाठी राखीव आहेत.

२४ नोव्हेंबर रोजी बंद होणाऱ्या या आयपीओने २२ नोव्हेंबरला पहिल्या दिवशी ६.५४ पट सबस्क्रिप्शन मिळवले.

पुणे येथे असणाऱ्या टाटा टेक्नॉलॉजीजने पहिल्या पब्लिक इश्यूसाठी ४७५-५०० रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला आहे. ३,०४२.५१ कोटी रुपयांचा हा IPO पूर्णपणे प्रमोटर टाटा मोटर्स आणि गुंतवणूकदार अल्फा टीसी होल्डिंग्ज आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड १ द्वारे ऑफर फॉर सेल (OFS) इश्यू आहे.

टाटा मोटर्सची टाटा टेकमध्ये ७४.६९ टक्के, अल्फा टीसी होल्डिंग्सची ७.२६ टक्के आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड १ ची ३.६३ टक्के भागीदारी आहे. (Tata Technologies IPO)

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news