पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आज बुधवारी काही प्रमाणात अस्थिरतेचे वातावरण राहिले. दरम्यान, आज सेन्सेक्स आणि निफ्टी सलग तिसऱ्या सत्रांत वाढून बंद झाले. सेन्सेक्स २७१ अंकांनी वाढून ७१,६५७ वर बंद झाला. तर निफ्टी ७८ अंकांच्या वाढीसह २१,६२३ वर स्थिरावला. क्षेत्रीय पातळीवर हेल्थकेअर, आयटी आणि मेटल प्रत्येकी ०.४ टक्के, तर रियल्टी आणि ऑईल आणि गॅस प्रत्येकी ०.३ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक किरकोळ वाढले. (Stock Market Closing Bell)
आजच्या ट्रेडिंग सत्रातील अस्थिर वातावरणात सेन्सेक्स, निफ्टी सुरुवातीच्या व्यवहारात सपाट झाले होते. त्यानंतर ते वाढून बंद झाले. बँक निफ्टी, बँक फायनान्सियल सर्व्हिसेस काही प्रमाणात वाढ झाली. पण मिडकॅपमध्ये नफावसुलीचा मूड दिसून आला. ऑटो, एफएमसीजी आणि पीएसयू बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक विक्री दिसून आली. तर मीडिया आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी झाली. (Stock Market Closing Bell)
संबंधित बातम्या
गुंतवणूकदारांनी महागाई आकडेवारी आणि या आठवड्यात महत्त्वाच्या कमाईच्या आधी सावध भूमिका घेणे पसंत केले. आजच्या सत्रात बँका आणि युटिलिटीजमध्ये सर्वाधिक घसरण झाली.
सेन्सेक्स आज ७१,३८३ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७१,११० पर्यंत खाली आला. पण बाजार बंद होण्याच्या अर्धा तास आधी तो ३०० अंकांनी वाढून ७१,७०० पार झाला होता. सेन्सेक्सवर रिलायन्स, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स हे सर्वाधिक वाढले. तर एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, इन्फोसिस हे शेअर्स घसरले.
एनएसई निफ्टीवर सिप्ला, रिलायन्स, अदानी एंटरप्रायजेस, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक हे टॉप गेनर्स होते. हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांनी वाढले. तर ओएनजीसी,, डिव्हिज लॅब, एनटीपीसी, बीपीसीएल, अल्ट्राटेक सिमेंट हे टॉप लूजर्स होते.
कार्लाइल एव्हिएशन पार्टनर्सने स्पाईसजेटमध्ये स्वारस्य दाखविल्याच्या वृत्तानंतर स्पाइसजेटचे शेअर्स बुधवारी एनएसईवर (NSE) सुमारे ४ टक्क्यांनी वाढून ६४.८० रुपयांवर पोहोचले. गेल्या १२ महिन्यांत हा शेअर्स सुमारे ७० टक्क्यांनी वाढला आहे.
भारतीय कॅसिनो ऑपरेटर डेल्टा कॉर्पने डिसेंबर २०२३ ला संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ५९ टक्क्यांची घसरण नोंदवली. या पार्श्वभूमीवर आज सुरुवातीच्या व्यवहारात डेल्टा कॉर्पचे शेअर्स सुमारे ५ टक्क्यांनी घसरून १४३.१० रुपयांच्या निचांकी पातळीवर आले. (Delta Corp Share Price) दुपारच्या सत्रात या शेअर्सची घसरण कमी होऊन तो १५३ रुपयांवर होता.
बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने अशिर्वाद मायक्रोफायनान्सचा IPO होल्डवर ठेवल्यानंतर बीएसईवर मणप्पुरम फायनान्सचे शेअर्स ७ टक्क्यांनी घसरून १६३.४ रुपयांवर आले. दुपारच्या सत्रात त्यात सुधारणा होऊन हा शेअस १६६ रुपयांवर गेला. (Manappuram Finance Share Price) IPO साठी होणारा विलंब हा मणप्पुरम फायनान्ससाठी मोठा धक्का आहे. ज्याने जून २०२२ मध्ये आशीर्वाद मायक्रोफायनान्समध्ये त्यांचे हिस्सेदारी वाढवली होती आणि त्याच्या व्यापक वैविध्यपूर्ण धोरणाचा भाग म्हणून बहुतांश भागभांडवल विकत घेतले होते.
जपानच्या निक्केई निर्देशांक (Japan's Nikkei share) सरासरी ३४ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर बंद झाला. कारण तंत्रज्ञानाच्या शेअर्सने अमेरिकेतील बाजारात काल नफा मिळवला. निक्केई निर्देशांक २.०१ टक्के वाढून ३४,४४१.७२ वर बंद झाला. या निर्देशांकाची फेब्रुवारी १९९० ची नंतरची सर्वोच्च पातळी आहे. मार्च १९९० नंतर प्रथमच या निर्देशांकाने ३४ हजारांची पातळी ओलांडली. तर विस्तृत टॉपिक्स (TOPX) निर्देशांक १.३ टक्के वाढून २,४४४.४८ वर पोहोचला. (Stock Market Closing Bell)