Latest

श्रीवल्लीचा नाद आता अल्लू अर्जुनच्या बायको आणि लेकीला सुद्धा लागला ! दोघींचा भन्नाट video पाहिला का ?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) याच्या 'पुष्पा : द राइज' चित्रपट गेल्या डिसेंबर महिन्यात रिलीज झाला. दोनच महिन्यात या चित्रपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील अल्लूचे धमाकेदार संवाद, आकर्षक गाणी आणि सोशल मीडियावरील त्याचे स्टेप्स प्रचंड व्हायरल होत आहेत.

या चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्याच्या स्टेपने चाहत्यांसोबत बॉलिवूड कलाकारांनी देखील भूरळ पडली आहे. हे गाणे सध्या वेगवेगळ्या भाषांमध्ये चाहत्याच्या भेटीस येत आहेत. अलीकडेच या गाण्याच्या हुक स्टेप्सवर भारतीयच नाही तर परदेशी लोकही उत्स्फूर्तपणे रील्स बनवत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका आई-मुलीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

पुष्पा चित्रपटातील 'श्रीवल्ली' गाण्याच्या हुक स्टेपवर एका आई आणि मुलगीने नुकताच ताल घरला आहे. या व्हिडिओत दोघींनी एक प्रसिद्ध असणाऱ्या डान्सरसारख्या 'श्रीवल्ली' गाण्यावर थिरकल्या. यावेळच्या डान्स स्टेपने चाहत्यांना भूरळ पडली आहे. या व्हिडिओत आईने हिरव्या रंगाची घागरा चोळी तर मुलगीने हिरव्या रंगाच्या घागरासोबत लाल रंगाची चोळी परिधान केली आहे. यामुळे दोघीचा ड्रेसिंग सेन्स आणि डान्स एक्सप्रेशन्स अप्रतिम आहेत. या दोघीच्या डान्सने रिअल असणाऱ्या 'श्रीवल्ली' गाण्याला टक्कर दिली आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'श्रीवल्ली', या सुंदर गाण्यावर आमचा छोटासा प्रयत्न. या गाण्यात सुंदरतेसोबत चांगल्या डान्स स्टेप करणे हा हेतू होता. हा डान्स तुम्हाला नक्की आवडेल अशी आमची आशा आहे. असे लिहिले आहे. यावरून श्रीवल्लीला टॅग केले गेल्याचे दिसत आहे. या व्हिडिओचे शुटिंग एका बागेत झाले असून आजूबाजूला अनेक झाडे दिसत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेन्टस पाऊस पाडला आहे. यात एका युजर्सने आई आणि मुलगी या जोडीला सर्वोत्कृष्ट जोडपे असे म्हटले आहे. हा व्हिडिओ nivedithashetty या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या रिल्सला आतापर्यत १८ हजार लाईक्स आणि २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय या दोघीचा आणखीही काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचलंत का? 

(video : nivedithashetty instagram वरून साभार)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT