पुणे : खोट्या सह्या करून मुलानेच घातला आईला लाखोंचा गंडा | पुढारी

पुणे : खोट्या सह्या करून मुलानेच घातला आईला लाखोंचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आईच्या बँकेत असलेल्या ठेवी, लॉकर मधील दागिने हडप करण्यासाठी मोठ्या मुलाने चक्क आईच्या खोट्या सह्या करून रोख रकमेसह ऐवज लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmedabad serial bomb blast case : मोठा निकाल! अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशीची शिक्षा, ११ दोषींना मरेपर्यंत जन्मठेप

हादी किफायत खलपे (36) आणि रमिजा हमीद आंबेडकर (30) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जबिन किफायत खलपे (62, रा. नताशा इन्क्लेव्ह, एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

किरीट सोमय्यांकडून १९ बंगल्यांचा सपशेल फुसका बार ! प्रसिद्धी स्टंट असल्याची अलीबागमध्ये चर्चा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हादी हा फिर्यादी यांचा मुलगा असून त्याने 15 मे ते 17 नोव्हेंबर 2020 च्या कालावधीत फिर्यादीच्या खोट्या सह्या करून वानवडीतील अ‍ॅक्सीस बँकेतून 80 हजार काढले. तसेच फियार्दीच्या 2 लाख 75 हजारांच्या मुदत ठेवी खोट्या सह्या करून काढल्या. फिर्यादींनी लहान मुलासाठी अ‍ॅक्सीस बँकेचया लॉकरमध्ये 30 तोळे दागिने ठेवले होते, ते देखील हादी आणि रमिजा यांनी खोट्या सह्या काढून काढून घेतले.

मेड इन चायना टेस्ला कारचे भारतात स्वागत केले जाणार नाही; नितीन गडकरींची स्पष्टोक्ती

फिर्यादी बँकेत गेल्यानंतर त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी कोंएवा पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुला विरोधात फिर्याद दिली, असून पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

आंतरराज्य विवाद सोडविण्यासाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाची स्थापना

चंद्रपूर : तब्बल ११ तासानंतर बिबट्याने फरफटत नेलेल्या राजचा मृतदेह सापडला

Power Bill : केंद्राकडून बसणार ‘शॉक’, विजेचे दर वाढण्याची शक्यता

Back to top button