Latest

SpiceJet aircraft : पाच हजार फुटांवर जीवघेणा थरार : दिल्‍लीत स्पाइसजेट विमानाचे आपत्कालीन लँडिंग

नंदू लटके

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
राजधानी दिल्लीत शनिवारी सकाळी मोठी विमान दुर्घटना टळली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (आयजीआय) जबलपुरच्या दिशेने उड्डाण घेतलेल्या एका स्पाइसजेटच्या विमानाचे ( SpiceJet aircraft ) आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

SpiceJet aircraft : १०० हून अधिक प्रवाशांचा जीव टांगणीला

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (आयजीआय) स्‍पाइसजेटच्‍या विमानाने जबलपुरच्या दिशेने उड्डाण घेतले. ५ हजार फुटांवर असतांना विमानामध्ये अचानक धूर दिसून आला.यावेळी स्पाइसजेटच्या एसजी-२९६२ विमानात १०० हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते.सकाळी ८ वाजता या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानात धुराचे लोळ दिसून आले.अशात विमानाचे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

महिन्‍याभरातील दुसरी घटना

सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना दुसऱ्या विमानाने जबलपुरला पाठवण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. काही तांत्रिक बिघाडानंतर विमानात धूर पसरला होता. पंरतु, यासंबंधीची सखोल तपासणी आता विमान कंपनीकडून केली जात आहे. गेल्या महिन्यात देखील १९ जून ला स्पाइसजेटच्या पटना-दिल्ली विमानात इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागली होती. या विमानात १८५ प्रवासी विमानात प्रवास करीत होते. गेल्या दोन महिन्यात अशाप्रकारच्या दोन घटना घडल्याने प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT