Latest

Korean Vlogger Harassed : कोरियन पर्यटक तरुणीशी महाराष्ट्रात छेडछाड; भररस्त्यावर लाजीरवाणा प्रकार, व्हिडिओ व्हायरल

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण कोरियातील एका पर्यटक तरुणीशी छेडछाड करण्याचा प्रकार राज्यात घडला आहे. या लाजीरवाण्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ही घटना राज्यातील असून नेमके ठिकाण कळू शकलेले नाही.

या कोरियन तरुणीचे नाव केली असे आहे. ती व्हॉल्गर असून तिच्या भटकंतीचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या व्हिडिओत छेडछाडीचा हा प्रकार रेकॉर्ड झाला आहे.

केली या व्हिडिओत काही स्थानिकांशी बोलताना आणि त्यांच्याशी फोटो घेत असताना दिसते. ती एका व्यापाऱ्यासोबत फोटो घेत असतान दुसरा एक युवक मध्येच आला आणि तिला मिठी मारली. या युवक बाजूच्या व्यक्तीला सांगत होता की फक्त तिच्या बाजूला उभे राहू नको, तिला अशी मिठी मार. केली या युवकाला दूर करण्याचा प्रयत्न करत होती, पण तरीही या युवक तिला मिठी मारताना दिसतो. केलीने या घटनेची माहिती पोलिसांत दिली आहे का नाही, याची माहिती उपलब्ध नाही. पण एक्सवर अनेक भारतीयांनी केलीची माफीही मागितली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी खारमध्ये एका कोरियन तरुणीसोबत असाच प्रकार घडला होता. यात दोन युवकांना अटकही झाली होती.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT