भंडारा: पुढारी वृत्तसेवा : साकोली तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकाने ९ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आजीने तक्रार दिली आहे. साकोली पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.
तालुक्यातील एका गावातील शिक्षकाने शुक्रवारी (दि.४) शाळेत खेळ शिकवत असताना मुलीशी अश्लील चाळे केले. त्यानंतर मुलीने घरी जाऊन आजीला हा प्रकार सांगितला. एक महिन्यापूर्वी याच शिक्षकाने पीडित मुलीला कार्यालयात बोलावून असाच प्रकार केला होता. या प्रकरणी शिक्षक देवराम लक्ष्मण पटले (वय ५६) याच्यावर पोस्कोअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय खोकले अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा