तांदुळवाडी ; पुढारी वृत्तसेवा तांदुळवाडी परिसरामध्ये काल (सोमवार) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यापूर्वी सकाळपासूनच उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत होता. दुपारनंतर आभाळ भरून आले आणि साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रचंड वारे आणि पाऊस सुरू झाला. यावेळी पावसासोबतच वाऱ्याचाही वेग प्रचंड होता.
वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे, फळझाडे यांचे प्रचंड नुकसान झाले. काही ठिकाणी जांभूळ, आंबा, रामफळ यांची झाडे उन्मळून पडली. आंब्याच्या झाडांना या वादळी पावसाचा फटका बसला. यावेळी आंब्यांचा खच झाडाखाली पडल्याचे चित्र दिसून आले. यामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा :