Latest

RaanBaazaar : बोल्ड-सेक्सचा तडका असलेला रानबाजार पाहून नेटकरी काय म्हणाले?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

तेजस्विनी पंडितची मुख्य भूमिका असलेली रानबाजार (RaanBaazaar ) वेबसीरीज प्लॅनेट मराठीवर पाहायला मिळतेय. पहिल्यांदाच इतके बोल्ड सीन्स तेजस्विनी पंडितने या सीरीजमध्ये दिले आहेत. त्याचसोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेदेखील आपला बोल्ड अवतार दाखवला आहे. सोशल मीडियावर या सीरीजचा ट्रेलर पाहिल्यानंतरच सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. आता या सीरीजला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. (RaanBaazaar ) ट्विटरवर रानबाजार हा हॅशटॅग सुरू असून, सोशल मीडिया युजर्सनी रानबाजार विषयी काय म्हटलंय पाहूया.

'सोशल मीडिया युजर्स म्हणतात- मी सीरीज पाहिली. अंगावर शहारे आणणारी सीरीज आहे.'

'खूपचं छान आहे. मी पाहिल्यानंतर आनंदित झालो. लोकांना विचार करायला भाग पाडणारी सीरीज आहे. तुम्ही पाहा.'

'खूप उत्तम कथानक आहे. सर्वांकडून खूप प्रेम मिळत आहे. मराठीतील उत्तम शो आहे.'

'मराठी इंडस्ट्रीतील मकरंद अनासपुरे, सचिन खेडकर आणि मोहन आगाशे यांच्या भूमिका खूपचं छान आहेत. मराठीतील ही उत्तम वेबसीरीज आहे. सर्वांनी ही सीरीज पाहावी.'

'प्लॅनेट मराठीवरील ही उत्तम वेबसीरीज आहे. यासारख्या सीरीज आणखी पहायला मिळाव्यात असे वाटते. रानबाजार खूप सुंदररित्या बनवलीय.'

'ही वेब सीरीज मराठी चित्रपट इंडस्ट्रीतील आतापर्यंतची सर्वात बोल्ड वेब सीरीज आहे. ही वेब सीरीज राजकारणातील रहस्यमय कांगोरे दाखवते. खऱ्या घटनांवरील संदर्भावर आधारित या वेब सीरीजमध्ये असं काहीतरी पाहायला मिळेल, जे तुम्ही यापूर्वी कधी पाहिलं नसेल.'

RaanBaazaar Web Series चा ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांच्या भूवया उंचावल्या आहेत, की कॅमेरासमोर इतका बोल्डनेस शक्य आहे?

याआधी या Web Series चा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करताना प्राजक्ता माळीने लिहिलं होतं की, 'प्रत्येक अभिनेत्याला आपल्या करिअरमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये चमकावं असं वाटतं. समाजात वेगवेगळ्या भूमिका साकारू इच्छितो. तो काही ना काही करत राहतो. काही ना काही करत राहतो. मी याला अपवाद नाही. मी स्मिता पाटील, रंजना यांना पाहत मोठी झालीय. (मी त्यांच्या इतकी मोठी नक्कीच झालेली नाही)

Prajaktta Mali आणि Tejaswini Pandit आणि अन्य कलाकारांनीही या वेब सीरीजमध्ये आव्हानात्मक भूमिका स्वीकारल्या आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT