Latest

Smriti Mandhana : स्मृती प्रेमात?; संगीतकार पलाशसोबतच्या फोटोमुळे रंगू लागली चर्चा

Shambhuraj Pachindre

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिचे बॉलीवूड कनेक्शन समोर आले आहे. स्मृतीने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बॉलीवूड दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक पलाश मुच्छाल याच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो समोर आल्यापासून स्मृती आणि पलाश एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. पलाश हा बॉलीवूड गायिका पलक मुच्छालचा भाऊ आहे. अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पलाशसोबतचे काही फोटो शेअर करताना स्मृतीने लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा चांगल्या मनाच्या व्यक्ती. तुझे वर्ष चांगले जावो. (Smriti Mandhana)

  • स्मृती आणि पलाश एकत्र दिसण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही स्मृतीच्या बर्थ डे पार्टीतील तिचे आणि पलाशचे काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये पलाश स्मृतीला केक खाऊ घालताना दिसत होता. याशिवाय स्मृती पलाशची बहीण पलक मुच्छाल आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत अनेक प्रसंगांमध्ये दिसली आहे. (Smriti Mandhana)
  • या फोटोंमध्ये स्मृती काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे, तर पलाश काळ्या रंगाची पँट आणि पांढर्‍या शर्टमध्ये दिसत आहे. स्मृतीच्या या पोस्टवर जेमिमा रॉड्रिग्स आणि हरलीन देओलसह भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इतर अनेक खेळाडूंनी कमेंट केल्या आहेत.
  • एका चाहत्याने 'तुम्ही दोघांच्या लग्नाची वाट पाहतोय' अशी कमेंट केली. तर एकाने लिहिले की, 'हे पाहून माझे हृदय तुटले.' एका युजरने तर 'सॉरी स्मृती, पण तू यापेक्षा चांगल्या व्यक्तीस पात्र आहेस', असे लिहिले.
  • पलाशने 'डिशकियाँ' चित्रपटाद्वारे संगीतकार म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अमिताभ बच्चन स्टारर 'भूतनाथ रिटर्न्स' या चित्रपटातील 'पार्टी तो बनाती है' हे प्रसिद्ध गाणेही त्याने संगीतबद्ध केले. नुकतेच पलाशने 'अर्ध' या चित्रपटातून दिग्दर्शनातही पदार्पण केले आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT