Latest

अबब… लहान नारळाच्या आकाराचे चिकू!

अमृता चौगुले

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा

खडकवासला येथील शेतकरी साहेबराव भाऊसाहेब मते यांच्या शेतातील चिकूच्या झाडाला नेहमीच्या फळापेक्षा आकाराने तीनपट मोठ्या व तब्बल अडीचशे ग्रॅम वजनाची चिकूची फळे आली आहेत.

लहान नारळाच्या आकाराच्या चिकू फळामुळे शेतकरीही आश्चर्यचकित झाले आहेत.विशिष्ट बदलामुळे मोठ्या आकाराचे चिकू आले असावेत, असा अंदाज कृषी अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. दरा भागात साहेबराव मते यांचे शेत आहे. पाच वर्षांपूर्वी कृषी दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना एक चिकूचे रोप मिळाले. त्यांनी ते शेतात लावले. तीन वर्षांपासून झाडाला फळे येत आहेत.

सुरुवातीला नेहमीसारखी फळे आली. यंदा मोठे चिकू लागलेत. मोठ्या फळांचे वजन अडीचशे ते तीनशे ग्रॅम आहे. हे चिकूचे झाड क्रिकेट बॉल प्रजातीचे आहे.असे पुण्यातील कृषिशास्त्रज्ञ डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT