Latest

Silicon Valley Bank : अमेरिकेतील बँकिंग क्षेत्र संकटात; सिलिकॉन व्हॅली बॅंकेला लागले कुलूप, भारतीय स्टार्टअपनादेखील फटका

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : अमेरिकतील महागाईनंतर पुन्हा बँकिंग सेक्टरला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेतील महत्त्वाच्या बँकांपैकी एक असलेली सिलिकॉन व्हॅली बँकेचे व्यवहार अचानक बंद करण्यात आले आहेत. स्टार्टअपना कर्ज देण्यासाठी प्रसिद्ध असलेली सिलिकॉन व्हॅली बँकेचे व्यवहार अचानक बंद झाल्याने शुक्रवारी शेअर बाजारातही याचे परिणाम दिसून आले. ही बँक बंद झाल्याने जगभरातील शेअर बाजारातील बँकिंग सेक्टरमधील शेअर्स घसरले आहेत. यामुळे सिलिकॉन व्हॅली बँकेची मूळ कंपनी SVB फायनान्सियल समूहाचे शेअर आज अमेरिकेतील शेअर बाजारात ७० टक्क्यांपर्यंत घसरले.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आर्थिक संकट सुरू झाल्यानंतर सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) अडचणीत आली. ठेवीदारांच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी, स्टेट बँकिंग नियामकाने बुडलेल्या या बँकेला तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला. सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) अचानक बंद झाल्याने जगभरातील शेअर बाजारात खळबळ उडाली आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्स झपाट्याने खाली आले.

सिलिकॉन व्हॅली बँकेच्या (SVB) सध्याच्या संकटाचा भारतासह जगभरातील स्टार्टअपवर देखील होणारा परिणाम नाकारता येणार नाही. स्टार्टअप्सवरील डेटा एकत्रित करणाऱ्या ट्रॅक्सन डेटानुसार, सिलिकॉन व्हॅली बँकेने भारतातील सुमारे २१ स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, त्यांच्यामध्ये किती रक्कम गुंतवली आहे, याची माहिती स्पष्ट झालेली नाही. या बँकेची सर्वात मोठी गुंतवणूक SaaS-unicorn iSertis मध्ये आहे.

बुडीत असलेली सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) फेडरल डिपॉझिटर इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) ला हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर बँकेची 210 अब्ज डॉलर किमतीची मालमत्ता विकली जाणार असल्याची माहिती बँकेच्या नियामकाने जारी केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे. यावर्षी अपयशी ठरलेली सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) ही FDIC-विमाधारक अमेरिकेतील पहिलीच बँक आहे. यानंतर FDIC ने एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सर्व सिलिकॉन व्हॅली बँकेची कार्यालये आणि शाखा 13 मार्च रोजी उघडतील. यानंतर सर्व विमाधारक, गुंतवणूकदार सोमवारी (दि.१३) सकाळपासून आपआपल्या खात्यांवर व्यवहार सुरू करू शकतील, असे म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT