US-China Conflict : अमेरिका-चीनमध्ये 2025 मध्ये होणार महायुद्ध! अमेरिकन हवाई दल अधिकाऱ्यांच्या वक्तव्याने खळबळ

US-China Conflict
US-China Conflict
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिका आणि चीन यांच्यात दोन वर्षांत महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेच्या हवाई दलाचे जनरल माइक मिनिहाल यांनी 2025 मध्ये अमेरिका आणि चीनमध्ये महायुद्ध होऊ शकते, असा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर जगाला धक्का बसला आहे.

एअर मोबिलिटी कमांडचे प्रमुख माइक मिनिहाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना २७ नोव्हेंबरला मेमो पाठवला आहे. यामध्ये चीनची हुकूमशाही ज्या प्रकारे वाढत आहे, त्यामुळे कधीही युद्ध होऊ शकते, असे म्हटले आहे. तसेच लष्करी अधिकाऱ्यांना युद्धाची तयारी करण्यासही सांगितली आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जनरल माइक मिनिहान म्हणाले की, "मला आशा आहे की मी जो विचार करत आहे तो चुकीचा सिद्ध होऊ दे. माझी भीती चुकीची असू दे, यामध्येच जगाचं कल्याण आहे. 2025 मध्ये मी युद्ध लढेन, असे माझे मन सांगते. अमेरिका आणि तैवान या दोन्ही देशांमध्ये 2024 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. त्या दरम्यान चीन तैवानवर लष्करी कारवाई करू शकतो. त्यामुळे 2025 मध्ये अमेरिका आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवू शकते,"

नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीमुळे तणाव वाढला

ऑगस्ट 2022 मध्ये अमेरिकेच्या सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली होती. तेव्हा चीन आणि अमेरिकेतील तणाव आणखी वाढला. पेलोसी यांच्या तैवान भेटीवर चीनने आक्षेप घेतला होता. चीनने तैवानला धमकी दिली होती आणि त्यांच्या हद्दीत हवाई सराव देखील केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news