Latest

श्रद्धा वालकर खून : आफताबच्या Bumble प्रोफाईलचा होणार तपास

मोहसीन मुल्ला

दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रद्धा वालकर खून (Shraddha Walker Murder Case) प्रकरणातील तिचा प्रियकर आफताब पूनावाला याचे अन्य महिलेशी प्रेमप्रकरण होते का, याचा तपास पोलिस करत आहेत. Bumble या डेटिंग अॅपकडून पोलिस याबद्दलची माहिती मागवणार आहेत. डेटिंग अॅपच्या माध्यमातून आफताब अन्य कोणत्या महिलेला भेटला होता का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

श्रद्धा वालकर आणि आफताब यांचीही भेट Bumble या डेटिंग अॅपवर झाली होती.

एएनआयने ही बातमी दिली आहे. "श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये असतानाच आफताबने काही महिलांना फ्लॅटवर बोलवले होते. या महिलांपैकी कुणी या खुनाचे कारण आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. त्यासाठी दिल्ली पोलिस Bubleला पत्र लिहून आफताबच्या प्रोफाईलची चौकशी करणार आहे," अशी माहिती पोलिसांनी एएनआयला दिली.

आफताबला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. आफताब आणि श्रद्धा लिव्ह इनमध्ये राहात होते. श्रद्धाचा खुनाचा आरोप आफताबवर आहे. खून केल्यानंतर आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि ते दिल्लीतील विविध भागात फेकून दिले.
श्रद्धाच्या खुनानंतर आफताब Bumble वर सक्रिय होता. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फ्रीजमध्ये असतानाच त्याने काही महिलांना फ्लॅटवर बोलवले होते, असे पोलिस तपासांत निष्पन्न झाले आहे. आफताबला भेटलेल्या महिलांचीही चौकशी पोलिस करणार आहे.
पोलिसांना श्रद्धाच्या शरीराचे १२ तुकडे मिळून आलेले आहेत. या तुकड्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.

SCROLL FOR NEXT