Latest

kdcc bank shivsena panel : कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार, निवेदिता मानेंचा सत्तारूढ गटातून अर्ज

backup backup

कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ५ जानेवारील मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांची बिनविरोध निवड झाली; परंतू शिवसेनेला महाविकास आघाडीत समाधानकारक जागा न मिळाल्याने स्वतंत्र्य पॅनेल उभे केले आहे. (kdcc bank shivsena panel)

kdcc bank shivsena panel : निवेदिता माने सत्तारूढ गटातून

यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या मातेश्री निवेदिता माने यांनी सत्तारुढ गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांनी पत्रकार परिषद घेत आपण जिल्हा बँकेसाठी पॅनेल उभारणार असल्याचे स्‍पष्‍ट केले. या पत्रकार परिषदेस जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेने अजून तिसर्‍या जागेची मागणी केल्यानंतर स्वीकृत संचालक देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आघाडीने दिला. शासकीय विश्रामगृह येथे तब्बल सहा तास चर्चेच्या फेर्‍या होऊनही वाटाघाटी फिस्कटल्या. रात्री नऊ वाजता शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले.

उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे :

गट प्रक्रियेतून संजय मंडलिक आणि बाबासाहेब पाटील

नागरी बँक आणि पतसंस्था गटातून आमदार प्रकाश अबिटकर यांचे बंधू अर्जून अबिटकर हे रिंगणात उतरले आहेत.

महिला गटातून : लतिका शिंदे आणि रेखा कुऱ्हाडे यांनी उमेदवारी

अनुसुचित जाती जमाती गटातून : उत्तम कांबळे

विमुक्त जाती जमाती : विश्वास जाधव

इतर मागासवर्गीय गटातून : रविंद्र बाजीराव मडके हे उमेदवार शिवसेनेकडून रिंगणात उतरणार आहेत, अशी माहिती अरूण दुधवडकर यांनी दिली.

आज (दि.२१) मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत अजून तिसरी जागा द्यावी; अन्यथा पॅनेलची घोषणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी 5 जानेवारीला मतदान

जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी 5 जानेवारीला मतदान होत आहे. अर्ज माघारीला शेवटचा दिवस बाकी असताना शासकीय विश्रामगृह येथे तब्बल सहा तास काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची बैठक झाली. गगनबावडा आणि कागल तालुका संस्था गटातून  पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार पी. एन. पाटील हे बिनविरोध झाले आहेत.

उर्वरित जागांवर ताकदीनुसार जो-तो लढणार असल्याचे यापूर्वीच ठरले आहे. उर्वरित नऊ गटांतील जागावाटपाचा तिढा कायम होता. शिवसेनेला प्रक्रिया गटातून खा. संजय मंडलिक आणि महिला गटातून माजी खासदार निवेदिता माने या दोन जागा सत्ताधारी आघाडीने देऊ केल्या आहेत.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT