पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा आज (5 , ऑक्टो) दसरा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात खाण्यापिण्याची व्यवस्थेची जोरदार चर्चा सध्या आहे. वडापाव, पुलाव, मिनरल वॉटरची जंगी तयारी इथे करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेला येणारा प्रत्येक शिवसैनिक हा उपाशी पोटी जाणार नाही याची खबरदारी शिंदे गटाने घेतली आहे. या सगळ्याचा आस्वाद घेऊन आता 'काय तो वडापाव, काय तो पुलाव, काय ते मीनरल वॉटर' हे उद्गार आता कार्यकर्त्यांमधून पाहायला मिळणार आहे.
या सभेच्या स्टेजमागे मंडप मारून एक किचन तयार करण्यात आले आहे. जिथे सर्व खाण्याचे पदार्थ बनवले जात आहे. या सोहळ्यात तीन कँटीन असणार आहेत. मुख्यंत्र्यांसाठी विशेष कँटीन, व्हीआयपी व्यक्तींकरता वेगळे तसेच आमदार, खासदार, इतर सर्व पदाधिकारी यांच्यासाठी एक वेगळे कँटीन बनवलेले आहे.
3 लाख वडापाव, २ लाख प्लेट पुलाव, १० लाख मीनरल वॉटरच्या बॉटलची सोय केलेली आहे. तनेत्यांसाठी देखील जेवणाची व्हीआयपी व्यवस्था केलेली आहे. ही सर्व व्यवस्था देखील पूर्ण झाली असल्याचे व्हीआयपी कँटीनच्या मॅनेजर यांनी सांगितले.फक्त व्हीआयपी जेवणाची व्यवस्था केली आहे. वडापाव, पाणी याच्यासाठी वेगळ्या कँटीनची सोय केली आहे.
हेही वाचा