Latest

राज कुंद्रा जेलमध्ये आणि शिल्पा शेट्टीचा गणेशोत्सव, नेटकरी म्हणाले…

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. पण, तिच्यावर टीका होत आहे.बॉलीवूडच्या अन्‍य सेलिब्रिटीप्रमाणेच शिल्पा शेट्टीही दरवर्षी मोठ्या धामधुमीत गणेश चतुर्थीला बाप्पांचं स्वागत करते.

प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही तिने घरी गणपती बाप्पांच्या मूर्तीचे स्वागत केले. यावेळी तिने आपल्या पतीविना बाप्पांचं स्वागत केलं आहे. ती फ्लोरल कुर्ता पँट सेटमध्ये खूप सुंदर दिसत होती. एकीकडे शिल्पा बाप्पांच्या आगमनाने ती खूप आनंदात आहे.

तर दुसरीकडे तिचं हे वागणं नेटकऱ्यांना आवडलेलं नाही. तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

अश्लील चित्रपटप्रकरणी १९ जुलैला क्राईम ब्रँचने चौकशीनंतर राज कुंद्राला अटक केली.  राज कुंद्रा सध्या जेलमध्ये आहे.

कुंद्रा जेलमध्ये आहे. आणि ती आपल्या मुलांसोबत आनंदोत्सव साजरा करतेय, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. राजशिवाय ती सध्या घरची संपूर्ण जबाबदारी एकटी सांभाळतेय.

पतीविना गणपती सेलिब्रेशन केल्याने सोशल मीडिया युजर्स तिला ट्रोल करत आहेत.

एका युजरने शिल्पाला ट्रोल करत लिहिलंय, 'आधी आपल्या पतीला तरी घेऊन ये.' तर दुसरीकडे युजरने लिहिलं, 'राजचं काय झालं? काय तो आताही जेलमध्ये आहे. त्याला जामीन मिळाला काय?' तर एकाने लिहिलं, 'पतीला तरी येऊ दे.'

SCROLL FOR NEXT