Latest

Pathan : शाहरुखने घेतले कोट्यवधी रुपये, जॉन-दीपिकाला किती मिळाले?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण (Pathan) चित्रपटामुळे चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांनी तो पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पठाण (Pathan) हा चित्रपट अली अब्बास जफर दिग्दर्शित करत आहेत. त्यांच्या या चित्रपटात शाहरुख खान शिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे चाहत्यांची या चित्रपटाबद्दल उत्कंठा आहे. तुम्हाला माहिती आहे का, या स्टार्सनी चित्रपटासाठी किती पैसे घेतले आहेत? या चित्रपटासाठी कोणत्या स्टारला किती मानधन मिळाले, जाणून घेऊया.

शाहरुख खान

रिपोर्टनुसार, अभिनेता शाहरुख खानने पठाण या चित्रपटासाठी ८५ कोटी मानधन घेतले आहे. २०१८ नंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

जॉन अब्राहम

या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणशिवाय जॉन अब्राहम देखील दिसणार आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेत्याने २० कोटी रुपये घेतले असल्याचे समोर आले आहे.

दीपिका पदुकोण

पठाण या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण अॅक्शन अवतारात दिसणार आहे. यासाठी तिने १८ कोटी रुपये घेतल्याचे समजते. याआधी दीपिका पदुकोणने शाहरुख खानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे आता या दोघांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र बघण्याची संधी चाहत्यांना मिळमार आहे. चाहते या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

सलमान खान

सुपरस्टार सलमान खान पठाण या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खानची एन्ट्री टायगर ३ साठी होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटासाठी सलमानला किती पैसे दिले आहेत, याची माहिती समोर आलेली नाही.

'पठाण'चे निर्माते यशराज फिल्म्सने एक खास व्हिडिओ शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलीय. व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसत होते आणि ते शाहरुखच्या 'पठाण' या पात्राची ओळख करून देत होते. 'पठाण' पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT