Latest

पश्‍चिम बंगालमध्‍ये राजकीय संघर्षातून सात जणांना जिवंत जाळले!

नंदू लटके

कोलकाता: पुढारी ऑनलाईन : पश्‍चिम बंगालमधील रक्‍तरंजित राजकीय संघर्षाचा भयावह चेहरा पुन्‍हा एकदा समोर आला आहे. राजकीय संघर्षातून तृणमूल काँग्रेसचे नेते व उपसंरपंचाची हत्‍या झाली होती. या हत्‍येनंतर जमावाने पाच घरांना आग लावली. यामध्‍ये सात जणांचा होरपळून मृत्‍यू झाल्‍याची धक्‍कादायक घटना बीरभूम जिल्‍ह्यातील रामपूरहाट येथे घडली.

सोमवारी रात्री बीरभूम जिल्‍ह्यातील रामपूरहाटचे उपसरपंच व तृणमूल काँग्रेसचे नेते भादू शेख यांची अज्ञातांनी ह्‍त्‍या केली होती. महामार्गावरुन जात असताना बॉम्‍ब हल्‍ल्‍यात भादू शेख हे जागीच ठार झाले होते. या घटनेनंतर गावात प्रचंड तणाव पसरला. जमावाने गावातील पाच घरांना बाहेरहून कुलूप लावले. यानंतर या घरांना आग लावण्‍यात आली. यामध्‍ये सात जणांचा होरपळून मृत्‍यू झाला. घटनास्‍थळी बीरभूतचे जिल्‍हाधिकारी, अग्‍निशमन दलाचे अधिकारी आणि पोलिसांनी धाव घेत परिस्‍थिती नियंत्रणात आणल्‍याचे सूत्रांनी म्‍हटलं आहे.

पश्‍चिम बंगालमध्‍ये राजकीय संघर्षातून होणार्‍या हत्‍यांचे सत्र सुरुच आहे. मागील आठवड्यात एका राजकीय पक्षाच्‍या दोघा पदाधिकार्‍यांची गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली होती.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT