सातारा, पुढारी वृत्तसेवा : पुणे – बंगळूरु महामार्गावरील खंबाटकी घाटातील बोगद्यातून होणारी वाहतूक आज (रविवार) दुपारी कोलमडली. कंटेनर बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होऊन कोंडी झाली. वाहनचालकांना बराच वेळ अडकून पडावे लागले. कंटेनर बाहेर काढण्यासाठी बोगदा मार्ग वाहतूक सुरू केल्याने येथेही वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक त्रस्त झाले होते.
हेही वाचलंत का ?
पाहा व्हिडिओ