Latest

Sanya Malhotra : सान्याने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

दंगल गर्ल सान्या मल्होत्राने (Sanya Malhotra) आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो शेअर केला आहे. तिचा या ड्रेसमध्ये लूक पूर्णपणे बदलला आहे. बिकिनीमध्ये तिचा लूक हॉट दिसत आहे. समुद्रकिनारी तिने एन्जॉय तर केला आहेच. शिवाय तिने स्कूबा डायव्हिंगचाही व्हिडिओ शेअर केला आहे. ती फॅशन जगतात अभिनयाच्या जोरावर आपली छाप सोडत आहे. ही अभिनेत्री अनेकदा तिचे आकर्षक फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते. आता सान्याच्या (sanya malhotra) बिकिनीतील फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सान्याचा बिकिनी लूक खूप पसंत केला जात आहे.

बिकिनीमध्ये सान्याचा आकर्षक लूक

दंगल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमाई करणारी सान्या मल्होत्रा ​सध्या तिच्या कामातून ब्रेक घेऊन सुट्टीचा आनंद घेत आहे. सान्याने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या स्वप्नातील ठिकाणाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. व्हेकेशनच्या पहिल्या फोटोमध्ये सान्या लेपर्ड प्रिंट बिकिनीमध्ये दिसत आहे.

बिकिनीमध्ये सान्याचा नो मेकअप नॅचरल लूक पाहायला मिळतो. सान्याचे विखुरलेले कुरळे केस तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत. बिकिनी लूकमधला सान्याचं गोड हसणं आणि दिलखेचक स्टाईल कोणालाही वेड लावू शकते. सान्याच्या एका व्हिडिओमध्ये समुद्राच्या लाटा पटकन लक्ष वेधून घेतात. काही फोटोंमध्ये निळे आकाश, हिरवाई आणि मधोमध असलेली पांढरी वाळू, नारळाची झाडं कोणालाही आकर्षित करू शकते. या अभिनेत्रीने बीचवर नारळ पाण्याचा भरपूर आनंदही घेतला. सान्याच्या सुंदर व्हेकेशनची एक झलक पाहून एखाद्याच्या मनात सुट्टीवर जाण्याची इच्छा नक्कीच होऊ शकते.

स्कूबा डायव्हिंगची मजा

सान्यानेही समुद्राच्या आतील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटला. अभिनेत्रीने समुद्राच्या आतील सुंदर व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये रंगीबेरंगी मासे आणि कासव दिसते. स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेताना ती या व्हिडिओत दिसत आहे. समुद्रात पोहताना सान्या एखाद्या जलपरीपेक्षा कमी दिसत नाही. सान्याने तिच्या सुट्टीतील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे आणि तो चाहत्यांसोबत शेअरही केला आहे.

सान्या मल्होत्राच्या या फोटोंना आतापर्यंत लाखो लोकांनी लाईक केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहते अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. त्याचवेळी, अभिनेत्री फातिमा सना शेखने सान्याचे कौतुक करताना लिहिले – ️❤️❤️❤️❤️ wowww, गायिका नीती मोहनने लिहिले – Uffff.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT