नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर ते संतप्त झाले आहेत. त्यांनी आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. आयएनएस विक्रांतच्या नावावर गोळा केलेले पैसे सोमय्यांनी खाल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
आयएनएससाठी गोळा केलेला पैसा कुठे गेला?. हजारो सैनिकांच्या रक्ताचा केलेला हा लिलाव आहे. भाजपने त्याचे उत्तर द्यावे, असे आव्हान संजय राऊतांनी दिले आहे. किरीट सोमय्या महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही आहेत. देशाच्या संरक्षणाच्या नावाखाली गोळा केलेला पैसा खाता. लोकं तुम्हाला मारतील. अशाप्रकारच्या देशद्रोह्यांना सुरक्षा द्यायची कशाला? असा सवाल करत केंद्राला लाज असेल तर सोमय्यांची सुरक्षा काढा, अशी मागणी त्यांनी केली.
कसाब आणि अफजल गुरुपेक्षा सोमय्यांनी गंभीर गुन्हा केलाय. पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांनी आता कश्मीर फाइल्स बघून झाली असेल तर विक्रांत फाइल्स बघावी, असाही टोला राऊत यांनी दिला.
आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्यात आला होता. तो पैसे राजभवनात जमा करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. आरटीआयमधून ही माहिती बाहेर आली आहे. जवळजवळ ५७ कोटी रुपये ही रक्कम असल्याची माहिती समजते आहे. याबाबत राज्यपालांच्या कार्यालयात आरटीआय अंतर्गत माहिती मागवण्यात आली होती त्यामध्ये राज्यपाल कार्यालयाकडून असा कोणताही निधी जमा झाला नसल्याचे सांगण्यात आले. असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
हा निधी भाजपच्या कार्यालयात गेला. या पैशाचा गैरवापर वापर किरीट सोमय्यांनी केला आहे. या घोटाळ्यात किरीट सोमय्या हेच मुख्य सुत्रधार आहेत. त्यांनी आपल्या कंपनीसाठी हा पैसा वापरल्याचे समोर येईल. ज्यावेळी हा पैसा गोळा करण्यात आला त्यावेळी आम्ही ५ हजार रुपये टाकून निधी दिला होता. पण हा सगळा पैसा किरीट सोमय्यांच्या कंपनीला गेल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
हे ही वाचा :