Latest

संजय राऊत म्‍हणाले, ‘विक्रांत’च्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना शिवसेना समुद्रात बुडवणार

backup backup

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन :  'सेव्ह विक्रांत'अंतर्गत सखोल चौकशी होऊन सोमय्या पितापुत्रांवर कारवाई झालीच पाहीजे. हा मनी लाँडरिंगचा प्रकार असू शकतो. आयएनएस विक्रांतबाबत देशाचे प्रेम आहे. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्‍या नेत्‍यांना देशद्रोह करणाऱ्या लोकांबद्दल तिरस्कार होता; मग अशा लाेकांची पाठराखण कशी करता, सोमय्या पितापुत्रांवर आरोप असुनही फडणवीस त्यांचे समर्थन कसे करतात, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केली.  आयएनएस विक्रांतच्या नावाखाली राजकारण करणाऱ्याना शिवसेना समुद्रात बुडवल्याशिवाय शांत बसणार नाही. सोमय्यांविरोधात राज्यभर शिवसेना आंदोलन करेल, असा इशाराही त्‍यांनी यावेळी दिला.

सोमय्यांचा मुखवटा गळून पडला: संजय राऊत

 सोमय्यांनी मोठा घोटाळा केला आहे. त्‍यांचा मुखवटा गळून पडला आहे.  भ्रष्टाचार करणाऱ्यांना देश मातीत घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही राऊत म्‍हणाले.

ज्या विक्रांतच्या आधारावर पाकिस्तानला भारताने धुळ चारली त्या विक्रांतला वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेला पैसा तुम्‍ही खाल्ला. आयएनएस विकून शहिदांच्या बलिदानाचा पैसा यांनी खाल्ला त्यांची वकिली देवेंद्र फडणवीस करतात हे दुर्दैवी आहे. एकडे राष्‍ट्रभक्‍तीची गाणी म्‍हणता आणि दुसरीकडे राष्‍ट्रद्राेहांचे समर्थन कसे करता, असा सवालही त्‍यांनी केला. पीएमसी बँकेच्या माध्यमातून विक्रांतचा पैसा चलनात आणल्याचा आराेपही त्‍यांनी या वेळी केली.

हेही वाचा: 

SCROLL FOR NEXT