कडेगाव ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितींचा आरक्षण सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करण्यात आलेला होता. त्यानुसार कडेगाव पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले असून, तालुक्यातील (महिलाराज) ८ पंचायत समिती गणांपैकी ३ गण अनारक्षित (खुले) आहेत. तर २ गण सर्वसाधारण महिला साठी राखीव आले आहेत.
एक गण अनुसूचित तर एक गण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग व एक गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला साठी राखीव करण्यात आलेले आहेत. एकूण 8 पंचायत समितीच्या गणांपैकी 4 गण हे महिलांसाठी राखीव करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कडेगाव पंचायत समितीमध्ये आता महिलाराज दिसणार आहे. दरम्यान, या आरक्षण सोडतमुळे अनेकांच्या राजकीय भवितव्याला ब्रेक लागणार आहे तर अनेक इच्छुकांच्या दांड्या उडाल्या आहेत. एकंदरीत कही खुशी काही गम असे वातावरण झाले आहे. आरक्षण सोडत करताना सहाय्यक जिल्हाधिकारी किरण कुलकर्णीं, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, नायब तहसीलदार विलास भिसे, बीडीओ सागर कुलकर्णी यांचेसह प्रशासकीय अधिकारी ,कर्मचारी तसेच राजकिय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तडसर : सर्वसाधारण महिला
शाळगाव : सर्वसाधारण
कडेपूर : अनुसूचित जाती महिला
हिंगणगाव बु. : सर्वसाधारण महिला
वांगी : नागरिकांचा मागास प्रवर्ग
नेवरी : सर्वसाधारण
देवराष्ट्रे : सर्वसाधारण
चिंचणी : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
हेही वाचलंत का?